राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मुंबईतही एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी परिस्थितीवर नाही तर काम कसं करायचं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगितलं. “परिस्थितीचा अधिक विचार करण्यात फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्तीचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो. मला त्या परिस्थितीत कसं काम केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे,” असं ते म्हणाले.
“संघाचे स्वयंसेवक असंच काम करतात. अनेक ठिकाणी संकटं होती, तिथे काम केलं. काही ठिकाणी लवकर झालं, तर काही ठिकाणी वेळ लागला. त्या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे याचा विचार केला. त्यामुळे काम पूर्ण झालं. नव्या परिस्थितीत भ्रम फैलावला जातो. संघाबाबत हे फार झालं. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रमाची स्थिती कायम राहते. सत्य समोर येताच भ्रम आपोआप दूर होतो. आमचं काम संस्काराचं आहे, प्रचाराचं नाही. प्रचारात आम्ही मागे आहोत. प्रचार करता करता प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतो. प्रचार केला तर प्रसिद्धी होते. प्रसिद्धी झाल्यावर अहंकार वाढतो. त्यापासून वाचणं हे आवश्यक असतं. प्रसिद्धी पावसासारखी असते. जिथे जेवढी पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे. कमी झाली तर खराब आणि जास्त झाली तरी खराब आहे. त्यामुळे प्रचार कार्याचा केला पाहिजे, व्यक्तीचा करू नये. जिथे जेवढा आवश्यक आहे, तेव्हाच करावा. असं आम्ही चालतो, म्हणून आम्ही मागे आहोत. पण त्यातही जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट आणि संपर्कातून आम्ही काम करत आहोत,” असं भागवतांनी स्पष्ट केलं.
“एका मोठ्या मासिकाचे संपादक संघाच्या विरोधत होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता उत्तर तरी किती देणार? मी त्यांना नागपूरच्या संघाच्या वर्गाला बोलावलं. तिथे ते दोन दिवस राहिले, तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपले. तरीसुद्धा त्यांचा एक प्रश्न होताच. संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण त्यांना विश्वास बसत नव्हता. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लोक पाहतात, तेव्हा त्यांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं आम्ही सांगतो. एक चमचा साखर खालल्यावर साखर गोड आहे हे तेव्हाच कळतं,” असं भागवत पुढे म्हणाले.
शहर
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
महाराष्ट्र
- सातारा: नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा! 'वेस्टर्न नेव्हल कमांड'च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात उत्साहात भव्य स्वागत
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- अमरावती: मस्तकी मानाचा मुकुट! १७ वर्षीय कुमकुम मोहोडचा आशियाई आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पराक्रम, ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?



























Subscribe to my channel




