अगदी सामान्य काळातही पंजाबमध्ये कुणीही हे मान्यकरायला तयार होणार नाही की, ‘सतलज’ हा ओटीटीचित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रकारे अचानक मागेघेण्यात आला, त्यामागे राजकारण नसेल. हा चित्रपट 48तासांच्या आत का मागे घेण्यात आला? प्रत्येकाला माहीतअसायला हवे की, एकदा का एखादी गोष्ट डिजिटलस्वरूपात तयार झाली की ती व्यापकपणे प्रदर्शित होणारच.पंजाबमध्ये अशा चर्चा आहेत की, तिथे पुढील वर्षाच्यासुरुवातीलाच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मग यावादाचा सर्वात जास्त फायदा कुणाला होणार आहे? आणियामुळे सर्वात जास्त नुकसान कुणाचे होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे, कट्टरतावादाचा काळ सुरू झाल्यानंतर‘बनावट चकमकींची’ चौकशी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रितअसलेला हा चित्रपट एका जुन्या तक्रारीला नवीन आयुष्यदेऊ शकतो. हा चित्रपट त्या असंतोषाला पुन्हा भडकावूशकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, यात कट्टरतावाद्यांना नायकबनवण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे, तो लपत नाही. 31ऑगस्ट 1995 रोजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या हत्येचीघटना चित्रपटात ज्या प्रकारे सादर करण्यात आली आहे,त्यावर लक्ष द्या. या दृश्यात तो दोहा गायला जात आहे, जोयुद्धातील हौतात्म्याच्या प्रसंगासाठी लिहिला गेला आहे.तिसरी गोष्ट म्हणजे, हा चित्रपट अशा तरुणांमध्ये राग निर्माणकरेल, ज्यांना दहशतवादाच्या त्या भूतकाळातील दशकाचाकोणताही अनुभव नाही आणि विशेषतः धार्मिक व कर्मठगटांना प्रभावित करेल. आणि चौथी गोष्ट म्हणजे, चित्रपटपाहून असे वाटते की पडद्यावर कट्टरतावादी आणिपोलिसांमध्ये कोणती तरी वैयक्तिक लढाई सुरू आहे. मतदारांचा मोठा समूह मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांवर, विशेषतः अकालींवर आधीच नाराज आहे. आता‘सतलज’ चित्रपट पाहिल्यानंतर आणखी जास्त नाराजझालेले हे मतदार अकाली दलाकडे परतणे तर शक्य नाही.ते कट्टरवाद्यांना पाठिंबा देतील अशीच शक्यता जास्त आहे.हा कर्मठ गट काँग्रेस किंवा ‘आप’ पक्षाकडे निश्चितचजाणार नाही. त्यामुळे फायदा एकाच पक्षाला मिळणार आहे. पंजाबमध्ये सत्ता आलटून-पालटून काँग्रेस, अकाली दलआणि ‘आप’ यांनाच मिळत आली आहे. चौथी शक्ती कट्टरवादी आहेत, अर्थातच ते मर्यादित आहेत. अकालींचीमते विभागली गेली आहेत, त्यामुळे त्यांना आणखी बाजूला फेकले जाऊ शकते. ‘आप’ला आपल्या सरकारविरोधातील असंतोषाचा सामना करायचा आहे. काँग्रेस अंतर्गत कलहात अडकली आहे. या उलथापालथीत हिंदू मते संघटित झाली,तर याचा फायदा केवळ भाजपला होईल पंजाबमध्ये शिखांची लोकसंख्या 58 टक्के आहे आणि ते अर्थातच बहुसंख्य आहेत, परंतु 40 टक्के हिंदू लोकसंख्याही महत्त्व ठेवते. जर शिखांची मते विभागली गेली आणि हिंदूमते संघटित झाली, तर हे राज्य अकल्पनीय कूस बदलूशकते. आपण या गटांचे आणखी तुकडे करू शकतो.शिखांमध्ये 60 टक्के लोकसंख्या जाटांची आहे, जेराज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 25 टक्के आहेत.यांची मते अकाली, कट्टरपंथी आणि काँग्रेसविरोधीछावण्यांमध्ये विभागलेली आहेत. जर त्यांची जास्तीतजास्त मते कट्टरवाद्यांकडे गेली, तर अकाली दल साफहोईल आणि फायदा ‘आप’ किंवा काँग्रेसला मिळेल.म्हणूनच भाजपला हिंदू मते संघटित करायची आहेत, जसेत्यांनी बंगाल आणि आसाममध्ये केले. जर त्यांना 70 टक्केहिंदू मते मिळाली, तर मते पाच भागांत विभागली गेल्यानेनिर्माण झालेल्या परिस्थितीत ते फायद्यात राहतील. पण पंजाबमध्ये मागासवर्गीय ते ही अशी एक शक्ती आहे,जिचे अचूक मूल्यमापन केले गेलेले नाही. ढोबळमानानेअसा अंदाज आहे की, इथे मागासवर्गीय मते सुमारे 33 टक्केआहेत, ज्यात शीख आणि हिंदू दोन्ही समाविष्ट आहेत.शिखांमध्ये हे मतदान सुमारे 35 टक्के आहे. दलित मतांवरपारंपरिकपणे काँग्रेसची मजबूत पकड राहिली आहे, परंतु‘आप’ने यात खिंडार पाडले आहे. या मतपेढीवर अनेकबाबा आणि डेऱ्यांचा जो प्रभाव आहे, तोही एक महत्त्वाचापैलू आहे. भाजप ही मतपेढी मजबूत करण्यात बऱ्याचकाळापासून गुंतला आहे पंतप्रधान पंजाबचा दौरा करणार आहेत. ते जालंधरच्यानवीन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील, परंतु उल्लेखनीयराजकीय पाऊल असेल संत निरंजन दासजी यांच्या‘गादीला’ म्हणजेच डेरा सचखंड बल्लांला असणारा त्यांचा संभाव्य दौरा. संत निरंजन दासजी हे रविदासी मागासवर्गीय समुदायाचे आध्यात्मिक गुरू मानले जातात. हिंदी पट्ट्यात ज्याला जाटव समुदाय म्हटले जाते, पंजाबच्या मागासवर्गीयांमध्ये त्या समुदायाचे प्रमाण सुमारे 50 टक्केआहे. या वेळी प्रजासत्ताकदिनी संत निरंजन दासजी यांचेनाव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणाऱ्यांच्या यादीतसमाविष्ट होते. तर यावरून तुम्ही गणित मांडू शकता. पुढील पाऊल मतदार यादीपर्यंत पोहोचते. कृषीकायद्यांवरून अकाली दलाशी काडीमोड घेतल्यानंतरभाजपने पंजाबमध्ये एकटे चालण्याचा निर्णयघेतला.2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची मतांचीटक्केवारी 18.65 झाली. हे यासाठीही प्रभावी वाटते,कारण काँग्रेस आणि ‘आप’ला प्रत्येकी 26 टक्के आणिअकाली दलाला 13.48 टक्के मते मिळाली, तर कर्मठशीख मते कट्टरपंथीयांच्या पदरात पडली. आता ते थेटलढतीच्या भूमिकेत आहेत. ते प्रत्येक गावात ‘सतलज’चित्रपटाचे प्रदर्शन का करत आहेत, हे तुम्ही समजूशकता भाजपला असे वाटत आहे की, जर त्यांनी 30 टक्के मतेमिळवली, हिंदूंचे प्राधान्य असलेल्या 55 मतदारसंघांतजास्तीत जास्त मते गोळा केली आणि डेऱ्यांच्या मदतीनेदलितांचा पाठिंबा मिळवला, तर ते राज्यातील सर्वातमोठा पक्ष बनू शकतात. आपण यावर लक्ष दिले पाहिजेकी, अकाली ‘सतलज’चे स्वागत करत आहेत, इतरलोक गप्प आहेत, तर केवळ भाजपचे रवनीतसिंग बिट्टूयावर टीका करत आहेत. तुम्ही असे म्हणू शकता की ते असेकरत आहेत कारण ते माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातूआहेत. पण जर तुम्ही असा विचार करत असाल कीभाजपचा एखादा नेता पक्षाच्या संमतीशिवाय वेगळा सूरआळवू शकतो, तर तुम्ही नक्कीच खूप भाबडे आहात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) राजकीय कूस बदलणे शक्यपंजाबच्या राजकारणाकडे तिथल्या लोकसंख्येच्यारचनेच्या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. पंजाबमध्येशिखांची लोकसंख्या 58 टक्के आहे आणि तेअर्थातच बहुसंख्य आहेत, परंतु 40 टक्के हिंदूलोकसंख्याही महत्त्वाची ठरते. जर शिखांची मतेविभागली गेली आणि हिंदू मते संघटित झाली, तरहे राज्य अकल्पनीय कूस बदलू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




