भारतीय शहरांसमोरील प्रमुख सार्वजनिक आरोग्य संकटांपैकी वायू प्रदूषण हे एक गंभीर आव्हान बनले आहे. लोकसंख्येची प्रचंड घनता आणि वाहनांचे उत्सर्जन, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे यांसारख्या प्रदूषण स्रोतांशी असलेली जवळीक यामुळे अनेक शहरी भाग कायमस्वरूपी प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत, ज्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. भारतामध्ये वायू गुणवत्तेबाबतची चर्चा आणि धोरणे प्रामुख्याने Continuous Ambient Air Quality Monitoring Stations (CAAQMS) कडून मिळणाऱ्या डेटावर आधारित आहेत. मात्र, ही मॉनिटरिंग केंद्रे बहुतेक वेळा लोकांच्या वास्तव्यात, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासाच्या मार्गांपासून दूर असतात. विविध अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, दाट लोकवस्तीच्या भागांतील नागरिकांना तुलनेने अधिक प्रदूषणाचा सामना करावा लागतो. विशेषतः मुले, गर्भवती महिला, श्वसन विकार असलेले लोक आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबे यांच्यावर याचा परिणाम अधिक तीव्र असतो. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शहरी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल आवश्यक आहे. यासाठी एक आशादायक उपाय म्हणजे ‘हेल्दी एअर झोन्स’ (Healthy Air Zones – HAZs) स्वीकारणे.’ या संकल्पनेत संपूर्ण शहराच्या सरासरी प्रदूषण मापनाऐवजी विशिष्ट भागांमध्ये लक्ष केंद्रीत करून वायू प्रदुषणाच्या स्रोतांवर भर दिला जातो. जागतिक स्तरावर ही संकल्पना ‘क्लीन एअर झोन्स’ किंवा ‘लो एमिशन झोन्स’ म्हणूनही राबवली जाते. मात्र, तिथे ही पद्धत प्रामुख्याने वाहतूक क्षेत्रापुरती मर्यादित असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर निर्बंध आणि वाहतूक नियंत्रण यावर भर असतो. भारतीय शहरे मात्र या चौकटीपलीकडे जाऊन वाहनेच नव्हे, तर बांधकाम, रस्त्यावरील धूळ, कचरा जाळणे आणि उद्योग यांसारख्या इतर प्रदूषण स्रोतांवरही लक्ष केंद्रित करू शकतात. हेल्दी एअर झोन्स शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये किंवा जिथे लोकसंख्या आणि वावर अधिक आहे अशा ठिकाणी राबवता येऊ शकतात. यामध्ये वाहतूक केंद्रे, मध्यवर्ती व्यापारी भाग, बाजारपेठा, पर्यटनस्थळे आणि मोठी सार्वजनिक स्थळे यांचा समावेश होतो. शहर प्रशासन उच्च लोकघनता असलेले भाग, प्रदूषण स्रोत आणि जास्त प्रमाणात प्रदूषणाच्या संपर्कात असलेले नागरिक यांची ओळख करून घेऊ शकते. यामुळे स्थानिक पातळीवर विशिष्ट गरजांनुसार उपाययोजना करता येतील, ज्याचा उपयोग पुढे शहरव्यापी वायू प्रदूषण नियंत्रण योजनेत होऊ शकतो. वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, HAZ अंतर्गत स्वच्छ वाहतुकीकडे संक्रमणाला प्राधान्य देता येईल. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन व अनुदान, सार्वजनिक वाहतुकीची वारंवारता आणि विश्वासार्हता वाढवणे, तसेच कमी अंतरासाठी चालणे आणि सायकलिंगला प्राधान्य देण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना करणे यांचा समावेश होतो. या झोन्समध्ये अतिप्रदूषणकारी मालवाहनांवर आणि जुन्या व्यावसायिक वाहनांवर कठोर निर्बंध घातले जाऊ शकतात. तसेच त्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतील. एज-टू-एज पेव्हिंग आणि नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे यांसारख्या पायाभूत सुविधा उपायांमुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होतो; टेलपाइप उत्सर्जन कमी होते. यामुळे रस्त्यावरील धूळ पुन्हा हवेत उडण्याचे प्रमाणही कमी होते. कारण ही धूळ सूक्ष्म कणांच्या (Particulate Matter) प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. या प्रकारच्या पायाभूत आणि नियामक उपायांमुळे प्रदूषण कमी होण्याचे फायदे थेट त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ मिळू शकतात. या झोन्समध्ये बांधकाम स्थळांवर कडक निरीक्षण आणि स्वच्छ बांधकाम पद्धतींची सक्ती करता येईल. पाडकामाच्या वेळी पाण्याची फवारणी, वाहनांच्या चाकांची स्वच्छता (wheel-washing), बांधकाम साहित्य आणि कचरा झाकून ठेवणे हे उपाय आजूबाजूच्या निवासी भागांना धूळ आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. दाट औद्योगिक वसाहती किंवा लहान उद्योगांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये स्वच्छ इंधनाकडे वळल्यास प्रदूषण नियंत्रण अधिक मजबूत होऊ शकते. महापालिकेने कचरा खुले जाळणे हे स्थानिक पातळीवरील वायू प्रदूषणाचे एक महत्त्वाचे कारण आहे. HAZ पद्धतीद्वारे स्थानिक व्यवस्थापन योजना तयार करता येईल. समुदाय सहभागातून जनजागृती वाढवता येईल आणि विकेंद्रीत कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा उभारता येतील. विद्यमान CCTV नेटवर्कचा वापर करून कचरा जाळण्याचे हॉटस्पॉट ओळखता येतील आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी निर्माण करता येईल. औद्योगिक क्षेत्रे किंवा मुख्य रस्ते आणि निवासी इमारती यांच्या दरम्यान शहरी जंगलांची लागवड आणि हिरवे बफर झोन्स तयार केल्यास हे नैसर्गिक फिल्टरप्रमाणे काम करून समुदायावर प्रदूषणाचा परिणाम कमी करतात. आजपर्यंत वायू गुणवत्ता व्यवस्थापनाकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रशासकीय प्रक्रियेचा आहे. HAZ पद्धतीमुळे स्थानिक नागरिकांना, समुदायांना, नगरसेवकांना आणि स्थानिक अधिकाऱ्यांना थेट सहभागी होण्याची संधी मिळते. यामुळे स्थानिक पातळीवर टिकाऊ आणि प्रभावी उपाय विकसित होऊ शकतात. हेल्दी एअर झोन्स हे ‘लिव्हिंग लॅबोरेटरी’ म्हणूनही काम करू शकतात, जिथे नवकल्पना तपासून पाहता येतात. लहान भौगोलिक क्षेत्रात उपायांची परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतर ते संपूर्ण शहरात राबवता येतात. फेब्रुवारीत पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन करण्यात आले आहे. या मंचावर शहर प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ आणि नागरिकांना अनुभव शेअर करण्याची आणि प्रयोगाअंती सिद्ध झालेल्या उपायांसाठी अंमलबजावणीचा आराखडा आखण्याची संधी मिळणार आहे. ‘हेल्थी एअर झोन्स’सारखे प्रयोग ग्लोबल साउथमध्ये यशस्वी उदाहरणे आधीच पाहायला मिळतात. आग्रा येथे ताजमहाल परिसरात खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यात आल्याने ऐतिहासिक वारसा आणि आरोग्य दोन्हींचे संरक्षण कसे करता येते हे स्पष्ट झाले आहे. तसेच कोलंबियातील बोगोटा शहरातील क्लीन एअर झोन्समध्ये स्वच्छ वाहतूक आणि समुदायिक आरोग्य यांचा प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. सर्वाधिक प्रदूषित मार्गांवर लक्ष केंद्रित करून उत्सर्जनात लक्षणीय घट करण्यात यश आले आहे. आरोग्य विशेषतः कमकुवत समाज घटकांचा प्रदूषण संपर्क कमी करण्यावर भर देऊन HAZ संकल्पना आपल्या शहरांचे रूपांतर करण्याचा मार्ग दाखवते. त्यामुळे स्वच्छ हवा हे केवळ धोरणात्मक उद्दिष्ट नसून प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
महाराष्ट्र
- अमरावती: जीर्ण वीज खांब कोसळल्याने शेतकरी दाम्पत्य व दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
- नागपूर: महिलेच्या घरात बेकायदा प्रवेश प्रकरणी पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका; नुकसानभरपाई देण्याचे आदेश
- पुणे: 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या गजरात ओतूरहून श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान.
- मुंबई: पनवेलमध्ये गाडेश्वर धरणात पोहताना एका युवकाचा बुडून मृत्यू; एक जण बेपत्ता!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



