गेल्या तीन-चार आठवड्यांत तवांगच्या ईशान्येकडीलआणि असफी-ला घाटाजवळ असलेल्या तक्सिंगभागात एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) ओलांडूनचिनी सैन्याने घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर आल्या. येथे पीएलएने भारतीय सैन्याला त्यांच्या गस्तीच्याठिकाणांपर्यंत जाण्यापासून रोखल्याचे सांगितले जाते .सरकारने अशी कोणतीही घटना घडल्याचे नाकारलेआहे. मात्र ‘अरुणाचल टाईम्स''ने या घडामोडींचे वृत्तप्रसिद्ध केले. तसेच भारताने तक्सिंग भागातील शेरा-5पॅट्रोलिंग पॉइंट सोडून दिल्यानेच हे घडल्याचा आरोपमाजी गृहसचिव आर. के. सिंग यांनी केला. खरे तर, काही घडले आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. येथील एलएसी मॅकमोहन रेषेने निश्चित झाली आहे, हे चीन मान्यच करत नाही. संपूर्णअरुणाचल प्रदेश हा आपलाच भाग असल्याचा दावा तो करतो. तो या भागाला ‘झांगनान'' किंवा ‘दक्षिण तिबेट''असे म्हणतो. 1962 च्या भारत-चीन युद्धात चीनने संपूर्ण ‘नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी''वर ताबा मिळवला होता.तेव्हा अरुणाचल प्रदेश याच नावाने ओळखला जातअसे. युद्धानंतर चीनने आपले सैन्य मॅकमोहन रेषेच्याउत्तरेला मागे घेतले. पण 1950 च्या दशकापासूनच रेषेच्यामूळ मार्गाबाबत मतभेद आहेत. या कारणामुळे भारतआणि चीन यांच्यात दाव्या-प्रतिदाव्यांचे राजकारणचालत आले आहे. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या बीजिंग दौऱ्याच्यापूर्वसंध्येला एका चिनी गस्ती पथकाने असफी-लाजवळ भारतीय सैनिकांच्या एका लहान तुकडीचे शस्त्रहिसकावून घेतले होते. नंतर त्यांनी हे सैन्य आणि त्यांचीशस्त्रे एका भारतीय ऑब्झर्व्हेशन पोस्टकडे सोपवलीहोती. एलएसीवरील चिनी घुसखोरीत विशिष्ट पद्धतदिसते. एखादा अधिकृत दौरा ठरतो किंवा जवळ येतो,तेव्हा बातमी बनेल अशी घटना घडवून आणली जाते.एलएसी ही दोन्ही देशांना मान्य असलेली सीमा नाही, हेदाखवणे हाच त्यामागील उद्देश असतो. 2013 मध्येचीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौऱ्यापूर्वीहीचिनी गस्ती पथक पूर्व लडाखमधील एलएसी ओलांडूनभारताच्या हद्दीत 19 किलोमीटर आत आले होते. त्यांनीराकी नाल्याजवळील एका जागेवर ताबा मिळवलाहोता. यामुळे भारतीय गस्ती पथकांना देपसांग बुल्जभागात प्रभावीपणे गस्त घालणे शक्य राहिले नव्हते. नंतरचीनने आपले सैन्य मागे घेतले. 2014 मध्ये शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्यापूर्वसंध्येलाही चिनी सैनिकांनी एलएसी ओलांडली.वादग्रस्त भागात रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीदोन्ही बाजूंच्या शेकडो सैनिकांमध्ये चकमक झाली.जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यानही हा तणाव कायमहोता. 2019 मध्ये भारताने जम्मू-कश्मीरचे दोनकेंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले, तेव्हा चीननेत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शीजिनपिंग नरेंद्र मोदींसोबतच्या दुसऱ्या अनधिकृत शिखरपरिषदेसाठी चेन्नईत आले. तेव्हा लडाखच्या पॅंगॉन्गतलाव भागात चिनी गस्त अचानक वाढली. यातूनच पुढेभारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. आतापुढील महिन्यात शी जिनपिंग पुन्हा भारतात येऊ शकतातआणि चीनच्या खोडसाळ हालचाली पुन्हा दिसूलागल्या आहेत. यामागे चीनचा नेमका काय हेतू असतो,हे समजणे कठीण आहे. चेन्नई शिखर परिषदेनंतर चीननेपूर्व लडाखमधील भारतीय ठाण्यांची नाकेबंदी का केलीहोती, हे समजणे नवी दिल्लीसाठीही कठीण गेले होते.चीन इथे एक खेळ खेळत आहे. 2017 पासून चीनच्यानागरी व्यवहार मंत्रालयाने अरुणाचल प्रदेशातील विविधठिकाणांना स्वतः दिलेली नवी नावे प्रसिद्ध केली.अशा 6याद्यांद्वारे 112 नावे घोषित केली. 7 ऑगस्ट रोजीभारताने त्याला प्रत्युत्तर देत 27 ठिकाणांची अधिकृतनावे जाहीर केली. तेव्हा चीनचा तिळपापड झाला. वस्तुस्थिती हीच आहे की, अरुणाचलमधील लोकांचातिबेटशी वांशिक संबंध नाही. या भागाला ‘दक्षिण तिबेट''असे नाव देऊन चीन एक संदेश देऊ पाहत असेल. पणप्रत्यक्ष युद्ध छेडण्याव्यतिरिक्त तो या प्रकरणात फारकाही करू शकत नाही. आजची स्थिती 1962 पेक्षावेगळी असून भारत आता एक अण्वस्त्रधारी देशहीआहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एलएसीवरील चिनी घुसखोरीमध्ये एकविशिष्ट पद्धत पाहायला मिळते. एखादाअधिकृत दौरा असतो, तेव्हा अशा घटनाघडवल्या जातात. एलएसी ही दोन्हीदेशांना परस्पर मान्य सीमा नाही, हेदाखवणे हाच त्यामागील उद्देश असतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




