जगातील सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी चीनने कोणती जागा निवडली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? ही जागा जगातील सर्वात गुंतागुंतीच्या भू-राजकीय आणि भूकंपाच्या दृष्टीने अस्थिर असलेल्या क्षेत्रांपैकी एक आहे. भारताच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, तिबेटमध्ये चीन यार्लंग त्सांगपो नदीवर एका अभूतपूर्व प्रकल्पाची उभारणी करत आहे. ही जगातील सर्वाधिक उंचावरून वाहणारी प्रमुख नदी आहे. भारतात याच नदीला आपण ‘ब्रह्मपुत्रा’ म्हणतो. वीजनिर्मिती क्षमतेच्या बाबतीत हे महाकाय धरण चीनच्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणालाही खूप मागे टाकेल. सध्या हेच जगातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या जलाशयामुळे भारताचा ईशान्य भाग आणि त्रिभुज प्रदेश (डेल्टा) असलेल्या बांगलादेशात राहणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या डोक्यावर पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा रोखून ठेवला जाईल. याबाबत सर्वात चिंताजनक इशारे परदेशी टीकाकारांकडून नव्हे, तर खुद्द चीनच्याच वैज्ञानिकांकडून दिले जात आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील गंभीर भूगर्भीय धोके नमूद करण्यात आले आहेत. भूवैज्ञानिकांचा निष्कर्ष असा आहे की, येथील भौगोलिक रचना अतिशय नाजूक आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की, येथे येणारे भूकंप मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवू शकतात. कारण यामुळे जलाशय आणि आजूबाजूच्या पायाभूत सुविधा, अशा दोन्ही गोष्टी धोक्यात येऊ शकतात. आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी जलाशयाचे उतार मजबूत करावेत, संरक्षक भिंती बांधाव्यात आणि प्रकल्पाच्या प्रमुख भागांची नव्याने रचना करावी, अशी शिफारस या शोधनिबंधाच्या लेखकांनी केली आहे. जेव्हा एखाद्या कम्युनिस्ट राजवटीखाली काम करणारे वैज्ञानिक असे इशारे देतात, तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. हे नवीन धरण ब्रह्मपुत्रा नदीच्या ‘ग्रेट बेंड’वर बांधले जात आहे. या ठिकाणी, भारतात प्रवेश करण्यापूर्वी ही नदी जगातील सर्वात खोल आणि सर्वात लांब दरीतून तीव्र उतारावरून खाली येते. हे ठिकाण हिमालयाच्या भूकंपप्रवण पट्ट्याच्या अगदी मध्यभागी स्थित आहे. हा पट्टा भारतीय आणि युरेशियन भूगर्भीय-थर (टेक्टोनिक प्लेट्स) संथ गतीने होणाऱ्या धडकेमुळे तयार झाला आहे. हा पृथ्वीवरील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक भाग आहे. येथे विनाशकारी भूकंप येण्याचा जुना इतिहास आहे. केवळ भूकंपाने एखाद्या धरणाचे नुकसान होऊ शकते, एवढाच धोका नाही, तर एक महाकाय जलाशय स्वतःच भूगर्भीय दबाव वाढवून भूकंपाला निमंत्रण देऊ शकतो. याचे एक संभाव्य उदाहरण चीनमध्येच पाहायला मिळाले होते. 2008 मध्ये तिबेटच्या पठाराच्या पूर्व सीमेवर आलेल्या भूकंपामुळे अनेक लोक मारले गेले. यात सर्वाधिक लोक सिचुआन प्रांतातील होते. एका महत्त्वपूर्ण संशोधनाचा निष्कर्ष असा होता की, बहुधा नवीन ‘जिपिंगपू’ धरणातील पाण्याच्या प्रचंड वजनामुळे खालील भूस्तरातील भेगेवर दबाव वाढला असावा आणि कदाचित त्यामुळेच अनेक दशके किंवा शतके आधीच तो भूकंप आला असावा. पण या वैज्ञानिक शक्यतेचा गांभीर्याने विचार करण्याऐवजी चीनने त्याहूनही मोठा धरण प्रकल्प सुरू केला आहे. तोही यापेक्षा अधिक नाजूक भूगर्भीय क्षेत्रात. मात्र, हिमालयातील परिसंस्था राष्ट्रीय सीमा मानत नाही आणि एखादे मोठे धरण फुटल्यास त्याचे परिणामही सीमा मानणार नाहीत. 2025 मध्ये म्यानमारमध्ये आलेला शक्तिशाली भूकंप, हा भूकंपप्रवण भाग एकमेकांशी किती जोडलेला आहे, याचाच पुरावा होता. त्याचे धक्के सुमारे 1,000 किलोमीटर दूर बँकॉकपर्यंत जाणवले होते आणि तिथे एक उंच इमारत कोसळली होती. ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारताची जीवनरेखा आहे. ती लाखो लोकांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. बांगलादेशात हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे स्रोत आहे. चीनने मेकाँग नदीवर बांधलेल्या महाकाय धरणांप्रमाणेच या महाकाय धरणामुळेही (सुपर-डॅम) नदीचा प्रवाह बदलण्याचा धोका आहे. तसेच, पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेला गाळ खालच्या भागापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपत्कालीन स्थितीत जलाशयातील साठवलेले पाणी सोडल्यास, दाट लोकवस्ती असलेल्या सखल मैदानी प्रदेशात विनाशकारी महापूर येऊ शकतो. तिबेटमधील अभियांत्रिकीच्या एका चुकीमुळे सुरू होणारी घटना बांगलादेशापर्यंत पसरणाऱ्या मानवी शोकांतिकेत बदलू शकते. चीनने पाण्याला राजनैतिक दबावाचे आणखी एक शस्त्र बनवले आहे.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) हिमालयातील परिसंस्था राष्ट्रीय सीमा मानत नाही; आणि एखादे मोठे धरण फुटल्यास त्याचे परिणामही सीमा मानणार नाहीत. 2025 मध्ये म्यानमारमध्ये आलेला भूकंप हा भूकंपप्रवण भाग एकमेकांशी किती जोडलेला आहे, याचाच पुरावा होता.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




