ब्रह्मा चेलानी यांचा कॉलम:चीनचे विस्तारवादी मनसुबे‎ आता मर्यादा ओलांडतायत‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या 2 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर‎निर्वासित तिबेटी कार्यकर्ते लोबगा रंगजेन यांनी‎आत्मदहन केले. ही एखाद्या व्यक्तीच्या नैराश्याची‎अभिव्यक्ती नव्हती. तिबेटच्या अस्तित्वाच्या योजनाबद्ध‎नाशाकडे जगाचे वाढते दुर्लक्ष वेधून घेण्याचा तो एक‎हताश प्रयत्न होता.‎ पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेनंतर लगेचच‎चीनने तिबेटवर नियंत्रण मिळवले. या प्रश्नाकडे बहुतांश‎वेळा मानवी हक्कांच्या दृष्टीने पाहिले जाते.त्यामागे ठोस‎कारणेही आहेत. आशियातील सर्वाधिक महत्त्वाच्या‎भू-राजकीय प्रदेशांपैकी एकावर नियंत्रण मिळवण्याचा‎हा प्रयत्न म्हणूनही त्याकडे पाहिले पाहिजे. नैसर्गिक ‎‎साधनसंपत्तीने समृद्ध तिबेटी पठार हिमालयाच्या कुशीत ‎‎वसले आहे. आशियातील अनेक प्रमुख नद्यांचे‎उगमस्थान येथे आहे. दक्षिण, मध्य व आग्नेय‎आशियाच्या दृष्टीने या प्रदेशाला अत्यंत महत्त्वाचे‎सामरिक स्थान आहे. गेल्या काही दशकांत चीनने‎तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. तेथे ‎‎व्यापक लष्करी पायाभूत सुविधा उभारल्या. मोठी धरणे ‎‎बांधली व सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांच्या‎उत्खननालाही गती दिली आहे. चीनचे अध्यक्ष शी‎जिनपिंग यांच्यासाठी केवळ भौगोलिक नियंत्रण पुरेसे‎नाही. संपूर्ण तिबेटी पठारावर कायमस्वरूपी व निर्विवाद‎नियंत्रण प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी‎तिबेटी समाजाची स्वतंत्र ओळखच नष्ट करणे हा प्रभावी‎मार्ग असल्याचे त्यांना वाटते. तिबेटी ही स्वतंत्र भाषा,‎परंपरा, खाद्यसंस्कृती आणि वेशभूषा असलेली वेगळी‎वांशिक ओळख आहे. ही ओळख पुसून त्यांना स्वतःला‎तिबेटी म्हणून न पाहण्यास भाग पाडणे, हा ‘जगाचे छत''‎मानल्या जाणाऱ्या प्रदेशावरील चीनी‎नियंत्रणाविरोधातील सर्व प्रतिकार संपवण्याचा प्रयत्न‎आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीनने सरकारी‎निवासी शाळांचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले‎असून तिबेटी मुलांना लहान वयातच तेथे पाठवले जात‎आहे. चीन या शाळांना विकासाचे माध्यम म्हणतो.‎प्रत्यक्षात या शाळांचा अभ्यासक्रम चीनबद्दलची निष्ठा‎निर्माण करण्यासाठी तयार केला आहे.‎ संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार 6 ते 18 वर्षे‎वयोगटातील 10 लाखांहून अधिक तिबेटी मुले या‎निवासी शाळांत शिकत आहेत. वर्षातील बहुतांश काळ‎त्यांना कुटुंब आणि संस्कृतीपासून दूर ठेवले जाते. त्यांना‎मँडारिन भाषेत शिक्षण दिले जाते. हान संस्कृतीचा‎परिचय करून दिला जातो. स्वतःची संस्कृती, धर्म व‎भाषा कनिष्ठ असल्याची भावना त्यांच्या मनात रुजवली‎जाते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर चीन चीनी समाजात‎पूर्णपणे मिसळेल आणि स्वतःची सांस्कृतिक ओळख‎विसरेल अशी तिबेटी पिढी घडवत आहे.‎ तिबेटची ओळख नष्ट करण्यासाठी चीनने आणखी‎काही पावले उचलली आहेत. 2023च्या अखेरीपासून‎चीनने सरकारी कागदपत्रे, राजनैतिक पत्रव्यवहार आणि‎माध्यमांमध्ये ‘तिबेट'' या नावाऐवजी ‘शिजांग'' हा‎अधिकृत उल्लेख सुरू केला आहे. हे नाव मांचू छिंग‎राजवंशाच्या शब्दावलीतून घेतले गेले असून तिबेट हा‎स्वतंत्र ऐतिहासिक प्रदेश नसून चीनचाच अविभाज्य‎भाग असल्याचा संदेश देण्यासाठी त्याचा वापर केला‎जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायातील काही संस्थांनीही‎या नामांतराला मान्यता दिली आहे. चीनबाहेरील काही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संग्रहालये, विद्यापीठे, संशोधन संस्थांनी ‘शिजांग'' हा‎उल्लेख स्वीकारला. पॅरिसमधील एका संग्रहालयाने‎तिबेटी कलावस्तूंना ‘शिजांग''मधून आलेल्या वस्तू असे‎संबोधले आहे. ब्रिटिश संग्रहालयानेही सिल्क रोडवरील‎प्रदर्शनात ‘तिबेट किंवा शिजांग स्वायत्त प्रदेश'' असा‎उल्लेख केला आहे. आता चीन हा प्रयत्न आणखी पुढे‎नेत आहे. 1 जुलैपासून ‘जातीय ऐक्य आणि प्रगती''ला‎प्रोत्साहन देणारा नवा कायदा लागू झाला. शी जिनपिंग‎यांच्या मोहिमेनुसार तिबेटी आणि इतर वांशिक‎अल्पसंख्याकांना कम्युनिस्ट पक्षाप्रती निष्ठेवर आधारित‎चीनी ओळख स्वीकारण्यास भाग पाडणे हे या‎कायद्यामागील उद्दिष्ट असल्याचे मानले जाते. जातीय‎ऐक्याला कथित धोका निर्माण करणाऱ्या कृतींना गुन्हा‎घोषित करणारा हा कायदा तिबेटी कार्यकर्ते, संशोधक व‎निर्वासित समुदायांना दडपण्याचे काम करू शकतो.‎(@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ चीनकडून 10 लाखांहून अधिक तिबेटी‎मुलांना मँडारिन भाषेत शिक्षण दिले‎जाते‎. हान संस्कृतीशी जोडले जात आहे.‎स्वतःची संस्कृती, धर्म , भाषा दुय्यम‎असल्याची भावना रुजवली जात आहे.‎

This post was originally published on this site.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *