कल्याण/डोंबिवली: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. दरम्यान, सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत (Quality Control) गंभीर प्रश्न समोर आले आहेत. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान रस्त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे उघडकीस आल्यानंतर, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले यांनी संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढत दणका दिला आहे. कामाच्या गुणवत्तेत कसूर चालवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना चांगल्या व खड्डेमुक्त रस्त्यांचा प्रवास करता यावा, यासाठी महापालिकेकडून विविध भागात रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मक्तेदार (कॉन्ट्रॅक्टर) निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याच्या आणि घाईघाईने थातुरमातुर कामे उरकून घेत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आणि स्थानिक जनप्रतिनिधींकडून प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर उपमहापौर राहुल दामले यांनी स्वतः प्रत्यक्ष प्रभागात जाऊन सुरू असलेल्या रस्ते कामांची अचानक पाहणी केली.
पाहणीदरम्यान रस्त्यांच्या डांबरीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे उपमहापौरांच्या निदर्शनास आले. रस्त्यावर टाकलेला साहित्य आणि कामाची गुणवत्ता निकषानुसार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची कानउघाडणी केली. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय सहन केला जाणार नाही, असे सांगत त्यांनी तात्काळ संबंधित रस्त्यांच्या कामाचे मटेरियल सॅम्पल (नमुने) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे सक्त आदेश दिले.
तसेच, जोपर्यंत प्रयोगशाळेचा अहवाल (Lab Test Report) सकारात्मक येत नाही आणि कामाची गुणवत्ता योग्य असल्याचा अहवाल मिळत नाही, तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे एकही बिल पास केले जाऊ नये आणि बिल तात्काळ रोखून धरावे, अशा स्पष्ट व कडक सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे भ्रष्ट व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, दर्जेदार कामे न झाल्यास आणखी कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




