
Pune : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वाघ यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी माेहिनी असल्याचो पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. वाघ यांचा खून करण्यापूर्वी पत्नी माेेहिनी हिने एका मांत्रिकाची भेट घेतली होती. तिने पती सतीश यांच्यावर जादुटोणा करण्यास मांत्रिकाल सांगितले होते, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
सतीश तात्याबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांचे अपहरण करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना ९ डिसेंबर २०२४ राेजी घडली होती. नेहमीप्रमाणे सकाळी वाघ फिरायाल निघाले होते. सासवड रस्त्यावर त्यांना धमकावून त्यांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले होते. उरळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात वाघ यांच्यावर शस्त्राने तब्बल ७२ वार करून खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह घाटात फेकून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणात सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी, अक्षय जावळकर,आतिश जाधव,पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली होती. वाघ यांच्या मुलाने याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
|
Pune : बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या वाकडमधील प्रकल्पावर कारवाईचा बडगा |
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींविरुद्ध गुन्हे शाखेने एक हजार पानांचे आरोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले. माेहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे २०१३ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा वाघ यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. अक्षयने वाघ यांच्या मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. अक्षय आणि पत्नी मोहिनी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सतीश वाघ यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी पत्नी माेहिनी हिच्याकडील आर्थिक व्यवहार काढून घेतले. त्यानंतर अक्षय याने दुसरीकडे घर घेतले. अक्षय आणि मोहिनी यांनी संगनमत करुन वाघ यांचा खून करण्याचा कट रचला.
याप्रकरणात पोलिसांनी न्यायवैद्यकीय पुरावे गोळा केले, तसेच आरोपी, फिर्यादी, साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. वाघ यांचा मोबाइल संच, गुन्ह्यात वापरलेली मोटार, शस्त्रे जप्त करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथकाने याप्रकरणाचा तपास करुन आरोपपत्र दाखल केले.
पती सतीश वाघ यांचा अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी मोहिनीने वर्षभरापूर्वी एका मांत्रिकाची भेट घेतली होती. वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास तिने मांत्रिकाला सांगितले होते. खून करण्यापूर्वी वर्षभरापासून आरोपींनी वाघ यांच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी अक्षयने वाघ यांच्या खून करण्याची सुपारी सराइत गुन्हेगार पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना दिली होती. तिघांनी त्यांचा खून करण्यासाठी प्रयत्न केले होते.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




