नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. राज्याच्या उद्योग विभागाने नाशिकमध्ये तब्बल ११ हजार कोटींची गुंतवणूक आणली असून, त्यानिमित्ताने आयोजित 'कुंभ उद्योग संगम' आणि 'नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट'मध्ये आज (६ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २९४ सामंजस्य करार (MoUs) केले जाणार आहेत.
३५ हजार रोजगारांची मोठी संधी
या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे आगामी ५ वर्षांत नाशिकमध्ये विविध क्षेत्रांत एकूण ३५ हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. कुंभमेळ्याचा फायदा केवळ धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित न राहता, उद्योग कायमस्वरूपी नाशिकमध्ये स्थिराववेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि उद्योग विभागाने या प्रक्रियेची जय्यत तयारी केली आहे. उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी माहिती दिली की, यापूर्वी झालेल्या १८ हजार कोटींच्या करारांनंतर आता कंपन्या जमिनी घेणे आणि परवानग्या मिळवण्याच्या टप्प्यावर आहेत, ज्याचे दृश्य परिणाम पुढील ३ ते ५ वर्षांत दिसतील.
महेंद्रची ५ हजार कोटींची ईव्ही झेप
नाशिकमधील ऑटोमोबाईल क्षेत्राचा कणा असलेल्या महेंद्र अँड महेंद्र कंपनीने ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) कारचा प्लांट सुरू करण्यासाठी आडवण येथे ५ हजार कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. यासोबतच लॉजिस्टिक सपोर्टही सुरू केला जाणार असून, यातून एकट्या महेंद्र समूहाकडून १० ते १२ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे.
संरक्षण क्षेत्रात जर्मन तंत्रज्ञानाचे आगमन
नाशिक आता 'डिफेन्स हब' म्हणूनही नावारूपास येत आहे. संरक्षण साहित्य उत्पादनातील जागतिक स्तरावरील आघाडीची जर्मन कंपनी 'बेर्निको वेगार्ड' नाशिकमध्ये ४ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार आणि टप्प्याटप्प्याने ३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाशी प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. नाशिकचे मुंबई आणि वाढवण बंदराशी असलेले कमी अंतर, उत्तम हवामान आणि कुशल मनुष्यबळ यामुळे ही कंपनी येथे येण्यास तयार आहे.
सागरी सुरक्षा तंत्रज्ञानात क्रांती
बेर्निको वेगार्ड ही कंपनी हाय-स्पीड व्हिसल्स (वेगवान नौका), प्रगत प्रोपल्शन सिस्टिम्स आणि कमी वजनाच्या कंपोझिट इंजिनिअरिंगमध्ये निष्णात आहे. सीमा सुरक्षा, सागरी देखरेख आणि संरक्षण दलांसाठी लागणारी मानवरहित स्वयंचलित यंत्रणा (Autonomous Solutions) तयार करण्यात या कंपनीचा मोठा वाटा असून, यामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




