आपल्या अलीकडच्या भारत दौऱ्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी भारताला अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एकअसल्याचे म्हटले होते, परंतु भागीदारीची ही ओळखीचीभाषा आता दिवसेंदिवस पोकळ वाटू लागली आहे. ट्रम्पयांची विधाने आणि टेरिफचा भारत-अमेरिका संबंधांवरपडलेल्या प्रभावांबद्दल बरेच काही बोलले गेले आहे.परंतु ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये परतण्यापूर्वीच द्विपक्षीय संबंध दबावाखाली होते. अलीकडच्या वर्षांत जसजसेचीनच्या वाढत्या धोरणात्मक व्याप्तीमुळे भारताचीप्रादेशिक स्थिती कमकुवत झाली आहे तसतसेअमेरिकेनेही दक्षिण आशियाई प्रदेशात अशी धोरणेअवलंबली आहेत, ज्यांनी भारतीय हितांकडे दुर्लक्ष केले आहे - आणि काही वेळा तर ती थेट त्यांच्या विरोधातही राहिली आहेत. बांगलादेश हे याचे एक स्पष्ट उदाहरण आहे. 2024मध्ये शेख हसीना यांच्या पलायनानंतर अमेरिकेनेसत्तांतराला पाठिंबा दिला. परंतु भारताला माहित होते की यामुळे गंभीर धोके निर्माण होतील, जे की झालेही.त्यानंतर म्यानमार आहे. 2021 मध्ये सैन्याने तेथील नागरी सरकार उलथवून टाकल्यापासून अमेरिकेने लष्करीसत्तेप्रति दंडात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे,ज्यामध्ये कठोर निर्बंध आणि बंडखोर गटांना लष्करीमदत यांचा समावेश आहे, असे असूनही यामुळे भारताच्या संवेदनशील ईशान्य सीमेवर सुरक्षेला धोकानिर्माण झाला आहे. गेल्या मार्चमध्येच एका अमेरिकननागरिकाला सहा युक्रेनियन नागरिकांसोबत कथितपणेपरवान्याशिवाय ईशान्येत प्रवेश केल्याप्रकरणी आणि ड्रोनयुद्धासाठी सत्ताविरोधी लढवय्यांना प्रशिक्षण आणिशस्त्रसज्ज करण्यासाठी म्यानमारमध्ये घुसखोरीकरण्याच्या आरोपाखाली भारतात अटक करण्यातआली होती. अमेरिकेने नेपाळकडेही आपल्याभारत-धोरणाचा भाग म्हणून पाहण्याऐवजी धोरणात्मकप्राधान्य म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्पयांनी परिस्थिती आणखीनच बिघडवली आहे, विशेषत:पाकिस्तानसोबत अमेरिकेचे संबंध पुढे नेऊन. पाकिस्तानहा दहशतवादी गटांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनलाआहे आणि सोबतच त्यांना लष्करी आणि गुप्तचर मदतदेणे सुरूच ठेवले आहे, या गोष्टीने काहीही फरक पडतनाही. ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिकसहकाऱ्यांनी असे असूनही तिथे नफ्याचे सौदे केलेआहेत. अमेरिकेने तर आता चीनच्या बाबतीतहीसलोख्याचा, उदार दृष्टिकोन स्वीकारण्यास सुरुवातकेली आहे. दोन्ही महासत्तांमध्ये धोरणात्मक स्पर्धाकायम असली तरी काही क्षेत्रांमध्ये ट्रम्प यांच्याअलीकडच्या करारांनी बरीच अनिश्चितता निर्माण केलीआहे - विशेषतः भारतासाठी. जिथे अमेरिका दीर्घकाळापासून भारताला हिंद-प्रशांतक्षेत्रात चिनी वर्चस्वाविरुद्ध एक महत्त्वाची लोकशाहीढाल म्हणून पाहत आली आहे, तिथे ती भारताच्याप्रादेशिक वर्चस्वाच्या विचारानेही कचरते. जसे की अमेरिकेचे सहायक परराष्ट्रमंत्री समीर पॉल कपूर यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते की, अमेरिका कोणत्याही एकाशक्तीला दक्षिण आशियात खूप जास्त प्रभावमिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. कपूरयांच्या टिप्पण्या ट्रम्प प्रशासनाच्या राष्ट्रीय सुरक्षारणनीतीची (एनएसएस) प्रतिध्वनी होत्या, ज्यानुसार अमेरिका कोणत्याही देशाला इतके वर्चस्वशालीबनण्याची परवानगी देऊ शकत नाही की तो अमेरिकनहितांना धोक्यात टाकू शकेल. अमेरिकेचेउपपरराष्ट्रमंत्री लँडाऊ यांनी अलीकडेच आपल्या नवीदिल्ली दौऱ्यात म्हटले की आम्ही भारतासोबत त्या चुकाकरणार नाही, ज्या आम्ही 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केल्याहोत्या. संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आता भारतालाधोरणात्मक भागीदार कमी आणि एक प्रादेशिक वआर्थिक प्रतिस्पर्धी जास्त मानते, ज्याला रोखायचे आहे.आपल्याला या नव्या वास्तवाशी जुळवून घ्यावे लागेल,जे आपल्या धोरणात्मक विचारसरणीत एका मूलभूतबदलाची मागणी करते. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) अमेरिका स्पष्टपणे सांगते की, आम्हीभारतासोबत तीच चूक करणार नाही, जी 20 वर्षांपूर्वी चीनसोबत केली होती.संदेश स्पष्ट आहे : अमेरिका आताभारताला धोरणात्मक भागीदार कमीआणि प्रादेशिक प्रतिस्पर्धी जास्त मानते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



