सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव गुण देखील सारखे नसतात. या प्रकारच्या विषमता निसर्गकृत आहेत. आत्म्याच्या किंवा जीवाच्या चैतन्याच्या स्तरावर एकत्व म्हणजे सर्व जीव त्या स्तरावर समान आहेत, सर्वांचा आत्मा एकाच गुणवत्तेचा आहे असं वाचलं, ऐकलं, म्हटलं जातं आणि त्यावर श्रद्धा आहे. मात्र विषमता इतर बाबतीत संभवते. व्यावहारिक, भौतिक जगामध्ये आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने, तसेच उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्य हा दैनंदिन प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. मागचं वर्ष,मागचा महिना,कालचा दिवस गेला तसा आजचा जाऊ नये. त्यामध्ये आज काहीतरी बदल व्हावा आणि कुठेतरी जिथे अडले होते तो अडथळा दूर व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मनुष्य एक शोध करत असतो. माणसाच्या आयुष्यातील सारी धडपड ही सुखाच्या प्राप्तीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी आणि सर्वार्थाने प्रगतीसाठी असते असे मला वाटते. परंतु असे करत असताना काही मानसिक स्वभाव असतात, काही विकार असतात, काही प्रवृत्ती असतात यांच्या प्रभावाने मनुष्य कुठेतरी दुसऱ्याची बरोबरी करायला पाहतो. आपण आपला स्वतःचा उद्देश न ठेवता दुसऱ्याचे अनुकरण करायला पाहतो दुसऱ्याच्या मागे जायला पाहतो. दुसऱ्यासारखे होणं, तसा प्रयत्न करणं म्हणजेच आपलेपणा, आपला वेगळेपणा आणि आपले स्वत्व हरवणे असाच अर्थ आहे. जसे संविधानाने आपणास आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच निसर्गाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे, इतरांना त्रास न होईल असे पण स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. ( याचा निरंकूशता असा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये). म्हणून कमीत कमी आपण आपले स्वतःचे छंद, आवडीनिवडी आपल्या पातळीवर तरी जोपासले पाहिजेत ज्याने स्वतःला आनंद होईल. आपल्याकडे दिवस रात्रीचे मिळून चोवीस तास असतात. त्यामध्ये झोप वगळता उरलेले तास आपण कशासाठी खर्च केले आणि त्यामध्ये निव्वळ स्वतःसाठी आपल्या आवडीसाठी, आपल्या आवडीने आपल्या आवडीचे जीवन क्षण जगण्यासाठी किती वेळ खर्च केला, मी स्वतःला किती वेळ दिला हे मात्र तपासले पाहिजे. आपण आपल्या सारखं, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे याची दुसरी बाजू अशी स्पष्ट होते की आपण दुसऱ्या सारखं जगलं नाही पाहिजे. मी जर इतर कोणा सारखं जगत असेल तर याचा अर्थ मी स्वतःला त्याच्या सारखं बनवू इच्छितो आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानून जगत आहे. त्यावेळी मी स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला,आपल्या अस्तित्वाला उच्च श्रेष्ठ असल्यापासून नाकारत असतो. म्हणून अनुकरण नको हेच सांगणं आहे. जे दुसऱ्याचं अनुकरण करतात, दुसऱ्याच्या मागे चालतात, दुसऱ्यासारखं व्हायला पाहतात ते कधीच सर्वात पुढे नसतात कारण ते पुढे जाणाऱ्याला पाहत असतात. समोरचा कुठे चालला आहे, काय करतो आहे कसे करतो आहे हे पाहण्यातच अनुकरण करणाऱ्याचा भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे स्वतः काही होण्याचा,काही बनण्याचा काही होऊन दाखवण्याचा बराचसा वेळ तर आपण गमावलेला असतो आणि उरलेल्या वेळात मग त्याच्यासारखं होता येत नाही. लोकं करत आहेत तेच तुम्ही करत असाल तर लोका सारखेच व्हाल. पूर्ण पण नाही, अर्धवटच. तुम्ही स्वतंत्र विचार करा. आपला उद्देश आपण निश्चित करा. गर्दीच्या मागे जाण्यात अर्थ नसतो कारण गर्दी महान असत नाही. स्वतः स्वतंत्र विचार करुन धैर्य पूर्वक चालणारा माणूसच महान बनतो. अनुकरण करु नका. स्वतः जळणाराच दीपक बनतो व स्वयं प्रकाशमान होतो. गर्दीतून चालत असताना सुद्धा आपण वेगळं असलं पाहिजे, आपण आपला विचार घेऊन चाललं पाहिजे. सर्वात आधी आपण स्वतः आपल्यावर, आपली बुद्धी आणि विचार, क्षमता यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सतत असे चिंतन केले पाहिजे की जे कोणी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बनले आहेत ते एक निश्चित उद्देश घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करून ध्येय प्राप्तीला पोहोचले आहेत. आपणही आपल्या जीवनाचा उद्देश निश्चितच केला आणि स्व कष्टाने त्या ध्येयाकडे या प्रकारे वाटचाल केली तर आपणही निश्चितच सर्वोत्कृष्ट होणारच. उच्च व्यक्तिमत्त्वाचा आदर्श असावा, सन्मान करावा पण आपण मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. बाजारामध्ये एका वस्तूचे अनेक उत्पादन असतात, परंतु ब्रँड म्हणावली जाणारी अशी एकच वस्तू असते एखाद्या कंपनीची. गळ्यात हार असतो परंतु लक्ष हारातल्या मुख्यपदक किंवा त्यात जडलेल्या माणिक, मोती,हिऱ्याकडे असते. हेच असते विशेषत्व. असेच चिंतन-मनन करत ध्येय प्राप्तीकडे स्वतःला मूल्यांकन करत जात राहिल्याने एक दिवस नक्कीच आपणही सर्वोत्कृष्ट असू याबाबत शंका नसावी. बलराज संघई, लेखक कवी गितकार 9420015108 वाळूज औद्योगिक परिसर छत्रपती संभाजीनगर
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- बीड: मुंबईकडे निघाल्यादरम्यान पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावली; बेडवरून हलणेही झाले कठीण, डॉक्टरांकडून तातडीचा इशारा
- मुंबई: गोरेगाव चेकनाक्याजवळ बिबट्याचा वाढता वावर; दूधसागर सोसायटी परिसरातील रहिवासी प्रचंड दहशतीखाली, अंधार पडताच नागरिक घरातच
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
महाराष्ट्र
- मराठवाडा: कोरडा दुष्काळ आणि पीकविम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा महामार्ग बंद; वाहतूक पूर्णपणे विस्कळीत!
- नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजित दिपके यांच्याकडून 'आदिवासी शाळा ठीक करा' नवीन अभियानाची घोषणा
- महाराष्ट्र: ११ रुपयांची सलाईनची नळी थेट ३२५ रुपयांना; आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी खासगी रुग्णालयांच्या अवाजवी नफेखोरीचा आणि आरडाओरड्याचा पोलखोल केला
- भंडारा: ऋषीपंचमीच्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, चार महिला वारकरी गंभीर जखमी
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




