ध्यान करायचे नसते, ध्यान लावायचे नसते. तर ध्यान सहज घडत असते. आपल्या रोजच्या घाईच्या जीवनात वेळ कुठे आहे की ध्यान केले जाईल? ध्यानासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.आपले जे काही काम आहे, ते पूर्ण लक्ष केंद्रित करुन, इतर गोष्टींचा विसर करुन करणे हेच सहज ध्यान. जी कृती प्रवृत्ती चालू आहे ती संपूर्ण लक्षपूर्वक, मौन साधून करत असताना वास्तविक ध्यानमग्नतेचा अभ्यास होईल. मग काही करत नसताना या अवस्थेत जाणे हे खरे ध्यान घडेल. जे मुद्दाम करावे लागले ते ध्यान कसे? निष्क्रियता ध्यान नक्कीच नाही. संपूर्ण सक्रियता हे ध्यान आहे. आपल्यात अनंत अशी आत्मशक्ती आहे, ती ऊर्जा आत्म-समृधीच्या दिशेने संपूर्ण सक्रीय करणे हेच उत्कृष्ट ध्यान असेल. लक्ष केंद्रित करणे किंवा ध्यान हे सकारात्मक असावे. विकृती किंवा जे आत्म्याचे स्वभाव नाहीत ( विभाव आहेत ),जीवाचे मूळ लक्षण नाहीत अशा गोष्टीत माणसाला लोभ, मोह,आवड आणि उत्साह असतो. मूळ आत्मस्वरूपाला विकृत करणाऱ्या अशा गोष्टींमध्ये निरस राहणे, रस,आवड न ठेवणे याचा अभ्यास, हीच ध्यानाची प्रारंभिक तयारी. आपण आपल्यात असणे, आत्म स्वभावांत रममाण असणे, स्व-केंद्रीत असणे, आपल्या एक स्व-आत्म्याशिवाय इतर जे काही आहे ते सर्व भौतिक जगातील पदार्थ, यांनाच 'पर' असे म्हटले आहे. यात आपले स्वतःचे शरीरही आले. वास्तविक पाहता ' ध्यान ' ही सर्वोत्कृष्ट शुद्ध आत्म अवस्था प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जीवाला,आत्म्याला, आत्मशक्तीला विकृत करणारी जी तत्व आहेत जसे की क्रोध, मान,माया, लोभ, मोह, दंभ,मत्सर, अत्याधिक इंद्रिय विषय लोलुपता यांचा अभाव करुन आत्म्याच्या मूळ शब्द स्वभावाची प्राप्ती विशिष्ट साधनेतून केली जाते. यासाठी सर्वप्रथम एकाग्रता साधावी लागते. ही एकाग्रता शरीर स्थिर करून चंचल मनाला आत्मस्थानी केंद्रित करणे अशी असते. शरीर स्थिर करण्यासाठी आसन धारण करणे. शारीरिक अवयवांची चंचलता थांबवणे, शरीरातील आंतरिक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी मुद्रा धारण करणे हे आवश्यक. तसेच चंचल मनाला स्थिर करण्यासाठी प्राणायाम, दीर्घश्वास, तणाव मुक्तीचे प्रयोग अशा प्रक्रिया असतात. या सर्व पूर्व तयारीलाच ध्यान समजणे अत्यंत चुकीचे आहे. परंतु दुर्दैवाने अशीच धारणा बहुसंख्य लोकांमध्ये आज रूढ आहे. स्व केंद्रीत असणे याचाच अर्थ असा की गतकाळाच्या स्मृती नको, भविष्यकाळातील चिंता आणि कल्पना नको. मग उरतो तो मात्र केवळ फक्त वर्तमान. या वर्तमान क्षणाला पकडून मनात कुठलेही विकार न ठेवता शुद्ध आणि मूळ आत्मिक स्वरूपाच्या प्राप्तीसाठी एकाग्र होणे हेच तर ध्यान आहे. हे ध्यान साधत असताना शरीरामध्ये अनेक ऊर्जा उत्पन्न होतात, त्यातच काहीतरी साध्य झाल्याची प्रचिती येत असते. त्याला सिद्धी असेही म्हणतात. या सिद्धीकडे फारसे लक्ष द्यायचे नसते. आपला मुख्य उद्देश शुद्ध स्वरूपात आत्मस्वरूप विकसित करणे हा कधीच विसरायचा नसतो. ध्यान केल्याने, ध्यान उत्पन्न झाल्याने आणि ध्यान साधल्याने आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अंतर्गत असलेल्या अनेक शक्तींचे उद्घाटन होते जसे की अनंत ज्ञान, अनंत दर्शन , अनंत शक्ती आणि अनंत चारित्र्य. यासह आपला शुद्ध आत्मा विराजमान होणे हेच ध्यानाचे परमसाध्य आहे. हीच सिद्ध अवस्था. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
हरिद्वारमध्ये ‘रोड रेज’; हळू चालवण्यास सांगितल्याने थार चालकाचा संताप, बसचालकाला धडक
क्रोएशियाच्या ओमीशमध्ये भीषण वणवा; आगीच्या ज्वाळांनी आकाश लाल, हजारो नागरिकांचे स्थलांतर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




