लोकशाही केवळ मतदान, सरकार किंवा सत्तांतरयापुरती मर्यादित नसते. ती सतत सुरू राहणारी संवादाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत सहमतीइतकेच असहमतीलाही स्थान असते. मात्र संवादात संयम,संवेदनशीलता आणि परस्परांविषयी आदर टिकून राहतो,तेव्हाच तो सशक्त राहतो. भाषेत अपमान, कटुता वउत्तेजना असते तेव्हा विरोध हळूहळू वैरात रुपांतरित होतो. सध्या भारतीय सार्वजनिक जीवनात हीच सर्वात मोठीचिंता बनली आहे. संसद असो, टीव्हीवरील चर्चासत्रेअसोत, निवडणूक सभा असोत किंवा सोशलमीडियावरील चर्चा — सर्वत्र भाषेतील संयम कमीहोताना दिसतो. विचारांपेक्षा उपरोधिक टीका, तर्कांपेक्षाटोमणे आणि संवादापेक्षा गोंधळ अधिक वाढतानादिसतो. त्यामुळे लोकशाही ही विचारमंथनाचे व्यासपीठ नराहता केवळ आक्रमक प्रदर्शनाचे माध्यम बनतअसल्याची भावना निर्माण होते. भारतीय लोकशाहीपरंपरेत मतभेदांना नेहमीच सन्मानाने व्यक्त करण्याचीसंस्कृती राहिली आहे. एखाद्या धोरणावर कठोर टीकाहोऊ शकते. एखाद्या विचारसरणीशी तीव्र असहमती असू शकते; परंतुव्यक्तीच्या सन्मानावर हल्ला करणे ही लोकशाही संस्कृतीमानली जात नाही. असहमती ही लोकशाहीची ताकदआहे तर अपमान हा तिच्या आत्म्याला धक्का देणाराप्रकार ठरतो.आजचा विरोधाभास असा आहे कीसार्वजनिक जीवनात भाषेचा उद्देश समजावूनसांगण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला हरवणे हा अधिक झाला आहे.शब्द आता संवादाचे पूल बांधत नाहीत, तर दरी निर्माणकरतात. वेगळे मत मांडणाऱ्या व्यक्तींना लगेचदेशविरोधी, व्यवस्था समर्थक किंवा अन्य कोणत्या तरीचौकटीत बसवले जाते. ही प्रवृत्ती केवळ राजकीय मतभेद मर्यादित करत नाही, तरसमाजातील संवादाच्या शक्यताही कमकुवत करते.भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याची विविधता.अनेक भाषा, धर्म, जाती आणि संस्कृतींनी बनलेल्या यादेशात संवादाची भाषा नैसर्गिकपणे समावेशक आणिसंवेदनशील असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय भाषाशैली अधिकफुटीरवादी होताना दिसत आहे. ‘आम्ही विरुद्ध ते’ यामानसिकतेचा प्रभाव संवादावरही पडत आहे. त्यामुळेसमस्येवर तोडगा शोधण्यापेक्षा विरोधकाला नैतिकदृष्ट्याचुकीचे ठरवण्यावर अधिक भर दिला जात आहे. सोशल मीडियाने हा प्रश्न आणखी तीव्र केला आहे. यामाध्यमाने संवाद अधिक लोकाभिमुख केला. पणत्याचवेळी संवादातील सभ्यपणा कमी केला. आता एखाद्या विचाराची गंभीरता महत्त्वाची राहिलेलीनाही; तो किती वेगाने व्हायरल होतो. हे अधिक महत्त्वाचेठरते. संयमी आणि विवेकपूर्ण मतांपेक्षा प्रक्षोभकप्रतिक्रिया अधिक वेगाने पसरतात. ट्रोल संस्कृतीमुळे असहमतीचे रूपांतर अनेकदाशिवीगाळीत झाले आहे. त्यामुळे कोणाचा युक्तिवादअधिक भक्कम आहे. यापेक्षा कोणाची प्रतिक्रिया अधिकआक्रमक आहे, हेच जास्त महत्त्वाचे बनले आहे.त्यामुळेच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोण सत्तेवरआहे हा नाही, तर आपण एकमेकांशी कोणत्या भाषेतसंवाद साधतो, हा आहे. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

१०७ वर्षे जुन्या गणेशोत्सव मंडळात १६ फूट बाप्पांवर पहिल्यांदाच 3D मॅपिंग!
कारखेल खुर्दच्या गणपती विसर्जनात चिमुकल्यांनी साकारले महापुरुष-संत! 🙏✨
वर्दीची दुसरी बाजू! पोलिसांनी गणेश मंडळाच्या गाड्याला रेटण्यासाठी केली मदत!
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




