संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकार पुनर्रचना साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप होता. मात्र, पुनर्रचनेबाबत कितीही वाद असले तरी, घटनात्मक व व्यावहारिक दोन्ही दृष्टिकोनातून लोकसभा जागांची पुनर्रचना होणे ही काळाची गरज आहे. शेवटची पुनर्रचना 1976 मध्ये झाली होती. त्यावेळी साधारणपणे 10 लाख लोकांमागे एक खासदार या हिशेबाने 55 कोटी लोकसंख्येसाठी 550 खासदार निश्चित करण्यात आले होते. तेव्हाच पुढील 25 वर्षांसाठी म्हणजे 2001 पर्यंत जागांच्या पुनर्रचनेवर बंदी घालण्यात आली होती. 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने ही बंदी पुन्हा 25 वर्षांसाठी वाढवली. म्हणजेच आता 2026 मध्ये पुनर्रचनेची गरज आहे. याचा व्यावहारिक पैलू असा की, सध्या सरासरी 26 लाख लोकांमागे एक खासदार येतो. साहजिकच, इतक्या मोठ्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणे जवळपास अशक्य आहे. अडचण अशी आहे की, लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास दक्षिण भारतातील ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे काम चोख बजावले आहे, त्यांची राजकीय ताकद आणि महत्त्व कमी होईल. सरकारने यावर सर्व राज्यांच्या जागा थेट 50 टक्क्यांनी वाढवण्याचा जो मार्ग काढला आहे, त्यानेही समस्येचे निराकरण होत नाही. कारण याचा फायदा मोठ्या राज्यांनाच मिळेल व त्यांचे संख्याबळ आणखी वाढेल. शिवाय, यामुळे आपण स्वीकारलेले लोकशाही प्रतिनिधित्वाचे लोकसंख्याशास्त्रीय तत्त्व बाधित होते. मग मार्ग काय? खरं तर दक्षिण भारताची मूळ तक्रार समजून घेणे गरजेचे आहे. भारताची संघराज्य रचना काही मोजक्या मोठ्या राज्यांच्या पकडीत आहे. उत्तर प्रदेश, प. बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार ही राज्ये मिळून जवळपास निम्मी लोकसभा बनवतात. इतर राज्यांचे महत्त्व कमी राहते. लोकसंख्येनुसार पुनर्रचना झाली किंवा 50 टक्क्यांच्या प्रमाणात, तरीही शेवटी ताकद यांचीच वाढेल आणि संघराज्य रचनेतील असंतोष कायम राहील. खरे तर भारताला राज्यांच्या पुनर्रचनेची पुन्हा गरज आहे. 1956 मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानंतर नक्कीच अनेक नवीन राज्ये बनली—सिक्कीम जोडले गेले. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे विभाजन करून झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड बनले. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला; पण आता त्याहीपेक्षा मोठ्या बदलांची गरज आहे. जी अतिशय मोठी राज्ये आहेत, त्यांचे एकापेक्षा जास्त भागांत विभाजन केले जाऊ शकते. 2011 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावतींनी उत्तर प्रदेशचे चार भाग करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावानुसार पूर्वांचल, अवध प्रदेश, बुंदेलखंड आणि हरित प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश बनवले जाणार होते. आज जेव्हा युपीची लोकसंख्या 20 कोटींच्या पार आहे, तेव्हा हे विभाजन त्या राज्याला प्रशासकीय सुलभता देऊ शकते. बिहार, बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूचेही किमान दोन भाग केले जाऊ शकतात. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सावधपणे पुनर्रचना करण्याची मागणी करते. अशी पुनर्रचना शक्य झाली तर संघराज्य रचनेवर काही राज्यांच्या वर्चस्वाची तक्रार कमी होईल. ज्याप्रमाणे हिंदी भाषिक एकापेक्षा जास्त राज्ये आहेत, त्याचप्रमाणे मराठी किंवा बांगला बोलणारी एकापेक्षा जास्त राज्ये असू शकतात. हीच गोष्ट तमिळ, कन्नड भाषिक राज्यांबाबतही लागू होऊ शकते. नवीन राज्यांच्या निर्मितीत त्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही विचार केला पाहिजे. काही राज्यांच्या सीमांमध्ये फेरबदल करता येऊ शकतात. छोटी राज्ये असतील तर विकासाच्या योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवता येतील. कदाचित ही गोष्ट मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवडणार नाही. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे विभाजन मान्य नसेल, कारण यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी होईल. मात्र, जर आपल्याला भारताची संघराज्य रचना सुदृढ ठेवायची असेल आणि दक्षिण राज्यांची नाराजी दूर करायची असेल, तर आज ना उद्या आपल्याला राज्यांच्या पुनर्रचनेचा विचार करावाच लागेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) शेवटची पुनर्रचना 1976 मध्ये झाली होतीआपल्याला भारताची संघराज्य रचना निकोप राहावी, द. भारतातील राज्यांनी सापत्न वागणुकीची तक्रार करू नये असे वाटत असेल, तर उशिरा का होईना आपल्याला राज्यांच्या पुनर्रचनेच्या दिशेने पाऊल उचलावे लागेल. लोकसभा जागांच्या पुनर्रचनेची नितांत गरज आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

कसबा गणपती मंदिरात चोरी; देणगीपेटी फोडून ₹६० हजार लंपास!
अल्पवयीन मुलीच्या खुनाबाबत ‘AI’ आणि ‘व्यसन’च्या बातम्या चुकीच्या; DYSP विपुल पाटील!
तब्बल ७ मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई; महापालिकेच्या कारभारावर सवाल!
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


