पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:खानपान जागृती ठेवल्यास अर्धेध्यान तिथेच पूर्ण झाले समजावे

या जगात अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. तशाच स्वभाव व वर्तनाच्याही काही जोड्या आहेत. त्यांचा एकमेकांशी योग्य मेळ असावा. उदाहरणाच घ्यायचे तर—ज्ञानासोबत विवेक, शील- सदाचार, सत्य- अहिंसा, सुख- शांती, प्रेम- आनंद आणि चरित्र- नैतिकता. हा मेळ आत्म्यापासून समजून घेऊ तेव्हाच साध्य होईल. आपण सर्वांनी शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवावे की यातून आपला प्रवास आत्म्याच्या दिशेने सुरू होईल. काही लोक म्हणतात की, ‘ध्यान करणे कठीण जाते.’ एक प्रयोग करून पाहा. आपण काय खातो-पितो, त्याबाबत जागरूक व्हा. अन्नाचा मानसिक आरोग्यावर खोल प्रभाव पडतो. अन्न शुद्ध असेल, तर ते आपल्या ‘ब्रेन-गट ॲक्सिस’ला मजबूत करते. आनंद देणारे 95% हार्मोन्स आतड्यांमध्ये तयार होतात, ही गोष्ट आहारशास्त्रज्ञांनीही जाहीर केली. आपण अन्नावर ताबा मिळवला. अन्न साध्य केले, तर समजा अर्धे ध्यान तिथेच पूर्ण झाले.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *