लहानपणी मी कधीच वडील बसण्याच्या आधी बसत नसे. त्यामुळे त्या दिवशी ते माझ्यानंतर बसले, तेव्हा ते मला काहीसे विचित्र वाटले. पण दुसरा पर्याय नव्हता. माझी पहिली कार – सेकंड-हँड फियाट – पार्किंगमधून काढून त्यांच्यापर्यंत आणायची होती. त्यांनी कारच्या छतावर हात ठेवला. जणू तिला आशीर्वादच देत होते. माझ्या बहिणीने पुढच्या सीटचे दार उघडले. त्यांना माझ्या शेजारी बसवले. त्यांचा हात धरावा म्हणून मी पुढे झालो. तो अनुभव पूर्णपणे वेगळा होता. माझ्या संपूर्ण बालपणात त्यांनीच माझा हात धरला होता. माझी लहान बोटे त्यांच्या रुंद तळहाताला घट्ट पकडून असत. पण त्या दिवशी त्यांच्या बोटांना माझ्याकडून आधाराची गरज होती. आम्ही दोन वेगळ्या काळात जन्मलो होतो. त्यांचा जन्म 1927 मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतात झाला होता तर मी स्वातंत्र्योत्तर पिढीतील होतो. तरी त्या दुपारी आम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी समानतेने बसलो होतो. मुंबईच्या उपनगरांतून जाताना आम्ही दोघेही खिडकीबाहेरचे आणि विंडशील्डमधून दिसणारे जग न्याहाळत होतो. कधी-कधी ते माझ्याकडे वळून पाहत व माझी नजर त्यांच्याशी मिळण्याची वाट पाहत. वाहतूक मंदावल्यावर आमच्या नजरा जुळल्या व मला अचानक बालपणीचा तो रोमांचक क्षण आठवला. तेव्हा मी त्यांच्या सायकलीच्या पुढील दांड्यावर बसत असे. त्या वेळी मागे सरकणारे रस्ते, झाडे व दुकाने पाहणे म्हणजे जणू काही जादूच वाटत असे. आता तीच आनंदाची भावना मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. घरी पोहोचलो आणि मी इंजिन बंद केले. त्यांच्या बाजूचे दार उघडण्यासाठी पुढे सरकलो, तेवढ्यात त्यांनी माझा हात धरला. ‘आपण थोडा वेळ इथेच बसून गप्पा मारू शकतो का?’ त्यांनी विचारले. मी थक्क झालो. आमच्या घरी त्यांचेच अंतिम मत असे. पण त्या दिवशी ते केवळ संवाद साधू इच्छित नव्हते, तर त्यासाठी माझी परवानगीही मागत होते. ‘का नाही?’ मी उत्तर दिले. मी कर्ज न घेता कार कशी विकत घेतली, याची चौकशी केल्यानंतर ते हळूच म्हणाले, ‘तुला काही आर्थिक मदतीची गरज आहे का?’ मी ‘नाही’ असे म्हणताच त्यांनी माझ्या डोळ्यांत खोलवर पाहिले आणि मंद आवाजात म्हणाले, ‘मला माफ कर. सेकंड-हँड सायकलपेक्षा जास्त काही मी तुला घेऊन देऊ शकलो नाही.’ त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि माझ्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आम्ही जवळपास पंधरा मिनिटे कारमध्येच बसलो. त्यांनी रेल्वेतील साध्या नोकरीबद्दल व आयुष्यात कधीही कर्ज न घेण्याच्या आपल्या ठाम तत्त्वाबद्दल सांगितले. ते म्हणाले, उत्पन्नाच्या मर्यादेत राहून जगल्यामुळे आपण नेहमी अभिमानाने मान उंच ठेवून रस्त्यावर चालू शकलो. दीर्घ सेवाकाळात निवृत्तीच्या वेळी सुट्ट्यांचे पैसे मिळावेत आणि माझ्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून त्यांनी क्वचितच रजा घेतली होती. त्या दिवशी मला उमगले की आई-वडील व मुलांचे नाते स्थिर नसते; ते सतत बदलत राहते आणि अनेकदा अत्यंत सुंदर रूप धारण करते. स्वतः एका मुलीचा पिता झाल्यानंतर मी त्यांचा प्रवास अधिक चांगल्या प्रकारे समजू शकलो. आमच्यात मतभेद होते. त्यांच्या काही विचित्र सवयीही होत्या. पण त्यांनी त्यांच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न केले होते, याची जाणीव झाली. चाळिशीनंतर मला हे समजू लागले की आपल्या पालकांचे स्वतःचे बालपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. पालकत्व ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्याचा परिपूर्ण अर्थ कुणालाच पूर्णपणे उमगत नाही. बहुतेक वडील आपल्या कमतरता आणि संघर्ष मुलांशी मित्राप्रमाणे शेअर करतात. आपली मुले कुटुंबातील मूल्ये जपत आयुष्यात यशस्वी होत आहेत, हे लक्षात आल्यानंतरच ते संवाद साधतात. मी आणि माझे वडील विवाह, आरोग्य, पैसा, भू-राजकारण आणि असुरक्षितता अशा अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलत असू. आमच्यात एक समान धागा होता – समर्पण. ते नेहमी आपल्या कुटुंबासाठी व कामासाठी पूर्णपणे समर्पित राहिले. ते स्थिर, कष्टाळू, खंबीर व वचनबद्ध अशा खडकासारखे उभे राहिले आणि त्यांनी माझ्यामध्येही तेच गुण पाहिले. फंडा असा की... वडील मुलाचे सर्वात चांगले मित्र असतात. त्यांना आपल्या मुलावर कुटुंबाची परंपरा, मूल्ये व जबाबदारी सोपवण्याइतका आत्मविश्वास वाटू लागतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने त्याचे जिवलग मित्र बनतात.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




