काही महिन्यांपूर्वी आम्ही एका घरकाम करणाऱ्या बाईंना कामावर ठेवले, कारण आमच्या जुन्या बाई लग्नानंतर दुसऱ्या शहरात गेल्या होत्या. नवीन बाईंची परिस्थिती बिकट होती आणि त्यांना नोकरीची खूप गरज होती. आम्ही त्यांना जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या आणि पगार किती हवा, असे विचारले. त्यांनी सांगितलेली रक्कम ऐकून आम्हाला धक्काच बसला. त्यांची आर्थिक स्थिती खूपच खराब आहे आणि त्या घासाघीस करू शकत नाहीत, हे आमच्या लक्षात आले. त्यांना जुन्या कामगारांचा पगार कुणाकडून तरी कळेलच, हे माहीत असल्याने आम्ही त्यांना जुन्या कामगारांइतकाच पगार देऊ, असे सांगितले. हे ऐकून त्या खूप आनंदी झाल्या. कामाला सुरुवात केल्यापासून त्या प्रत्येक बाबतीत जुन्या कामगारांपेक्षा सरस काम करत आहेत आणि नेहमी हसतमुख असतात. वाढीव कामासाठी आम्ही त्यांना जास्तीचे पैसे दिले, तेव्हा त्या भावुक होऊन रडल्या. अर्थशास्त्राचा मूलभूत नियम आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की, किंमत गुणवत्तेवर परिणाम करते. विश्वासार्ह मशिनरीसाठी आपण जास्त पैसे द्यायला तयार असतो, कारण ती बंद पडणे आपल्याला महागात पडते. महत्त्वाच्या कामांसाठी आपण अनुभवी वकील नेमतो, कारण तिथे झालेली चूक महाग पडू शकते. तरीही काही संस्था अशी अपेक्षा करतात की, उच्चशिक्षित व्यावसायिकांनी त्यांच्या कौशल्याशी न जुळणाऱ्या पगारावर असाधारण निकाल द्यावेत. ‘ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ (जीएचएमसी) याचे एक उत्तम उदाहरण आहे, जिथे स्वच्छता कर्मचाऱ्याचे वेतन कुशल आयटी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त आहे. जीएचएमसीने नुकत्याच काढलेल्या एका टेंडर नोटिफिकेशनमध्ये हार्डवेअर इंजिनिअर, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, प्रोग्रामर, टीम लीडर, जीआयएस ॲनालिस्ट आणि वेब डिझायनर यांसारख्या पदांसाठी व्यावसायिक मागवले होते. यावरून लोकांचे लक्ष वेधले गेले, कारण दिलेला पगार खूपच कमी होता. जीएचएमसीने 12 हार्डवेअर इंजिनिअर्ससाठी 28 हजार रुपये मासिक वेतन प्रस्तावित केले. एमटेक आणि तीन वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ जीआयएस ॲनालिस्टसाठी 37 हजार रुपये आणि बीटेकसह सहा वर्षांचा अनुभव असलेल्या वेब डिझायनरसाठी 42 हजार रुपये मासिक वेतन निश्चित केले गेले. याउलट, नव्याने नियुक्त झालेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला दरमहा साधारण 30 ते 35 हजार रुपये मिळतील. वरिष्ठता वाढली की, त्यांचा पगार 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. विशेष म्हणजे, आयटी क्षेत्रातील आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा झालेली नाही, असे कारण जीएचएमसी अधिकाऱ्यांनी दिले आहे. याचा पहिला परिणाम असा होतो की, सर्वात चांगले उमेदवार अर्जच करत नाहीत. कुशल व्यावसायिकांना आपली किंमत माहीत असते. जर त्यांनी शिक्षण, प्रमाणपत्रे आणि अनुभव मिळवण्यासाठी अनेक वर्षे खर्च केली असतील, तर ते स्वाभाविकपणे संधींची तुलना करतात. अव्यवहार्य पगारामुळे निराश उमेदवार किंवा चांगली संधी मिळेपर्यंत या नोकरीला तात्पुरता निवारा मानणारे लोकच आकर्षित होतात. दुसरा परिणाम अधिक नुकसानकारक आहे. जे लोक नोकरी स्वीकारतात, ते पहिल्या दिवसापासून असमाधानी असतात. प्रत्येक कामाच्या वेळी त्यांना आपण कमी लेखले जात आहोत, याची जाणीव होते. ‘मी अधिक चांगले योगदान कसे देऊ शकेन?’ असा विचार करण्याऐवजी, ‘इथून किती लवकर बाहेर पडता येईल?’ असा प्रश्न ते विचारू लागतात. कोणतीही प्रेरणादायी भाषणे किंवा टीम-बिल्डिंग उपक्रम सतत होणाऱ्या अन्यायाच्या भावनेची भरपाई करू शकत नाहीत. संस्थेला याची छुपी किंमत मोजावी लागते. कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढते. प्रकल्प संथ होतात. प्रत्येक राजीनाम्यासोबत ज्ञान बाहेर जाते. भरतीचा खर्च वाढतो. व्यवस्थापक प्रतिभेला वाव देण्यापेक्षा नवीन माणसे शोधण्यात जास्त वेळ घालवतात. शेवटी, ग्राहकही सेवा आणि कामाच्या दर्जातील अस्थिरता लक्षात घेऊ लागतात. परंतु, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्टार्टअप किंवा छोट्या व्यवसायाने बहुराष्ट्रीय कंपन्यांइतकाच पगार दिला पाहिजे. संसाधनांमध्ये तफावत असतेच. पण, निष्पक्षता कधीही हरवता कामा नये. जर पैसा मर्यादित असेल, तर संस्था पारदर्शक वाढ, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन, शिकण्याच्या संधी, अर्थपूर्ण जबाबदाऱ्या आणि सन्मान देऊन त्याची भरपाई करू शकतात. जर कर्मचाऱ्यांना भविष्याची खात्री वाटली, तर ते अनेकदा कमी पगारावरही काम करायला तयार होतात. मात्र, जिथे त्यांना कमी लेखले जाते आणि वाढीचे कोणतेही आश्वासन नसते, अशी स्थिती ते कदाचित स्वीकारणार नाहीत. फंडा असा आहे की जेव्हा माणसे सन्मानित अनुभवतात, तेव्हा ती मनापासून योगदान देतात. जेव्हा त्यांना अपमानित वाटते, तेव्हा ती केवळ वेळ घालवतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पिसोळीत डंपरची दुचाकीला धडक; दोन विद्यार्थी गंभीर जखमी! 🚛💥⚠️
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांची नोटीस; आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका! 🇮🇳⚖️
हडपसरमध्ये २० वर्षे जुनं झाड कोसळलं; सुदैवाने जीवितहानी टळली! 🌳⚠️
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




