जेव्हा एखादा कॉलेजचा विद्यार्थी मला विचारतो की, एआयच्या या नवीन जगात कोणते कौशल्य सर्वात महत्त्वाचे आहे, तेव्हा माझे उत्तर नेहमी ‘सातत्य’ हे असते. म्हणजे एखादे काम फक्त काही महिने किंवा वर्षे नाही, तर दशकानुदशके करणे. त्यात एक दिवसाचाही खंड न पडू देणे. ही केवळ कष्टाची गोष्ट नाही, तर तो एक असा शिस्तबद्ध भाव आहे, जो प्रत्येक आई कोणतीही तक्रार न करता आयुष्यभर जपते. या प्रश्नावर मनुष्यबळ (एचआर) क्षेत्रातील तज्ज्ञांची उत्तरे वेगळी असू शकतात. जसे की - सुव्यवस्थित असणे, प्रामाणिकपणा, सकारात्मकता, विश्वासार्हता, समर्पण किंवा उत्तम संवाद कौशल्य. मात्र, जर तुम्ही ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमॅन यांना विचारले, तर त्यांचे उत्तर यशासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व गुणवत्तेपेक्षा वेगळे असेल. ते म्हणतील, ‘हाय-एजन्सी बना.’ आल्टमॅन दीर्घकाळ टिकणाऱ्या लवचिकतेवर आणि दीर्घकालीन ध्येयावर भर देत आले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘हाउ टु बी सक्सेसफुल’ या निबंधातही याचा उल्लेख केला आहे. पण जसजसे एआय रोजची कामे स्वयंचलित (ऑटोमेट) करत आहे, तसतसे त्यांचे लक्ष ‘हाय-एजन्सी’ या संकल्पनेवर स्थिरावले आहे. हे तुम्ही 2024 ते 2026 या काळात त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये पाहू शकता. ‘हाय-एजन्सी’ म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी एका ‘डिटेन्शन टेस्ट’पासून सुरुवात करूया. तयार आहात? पूर्ण लेख वाचण्यापूर्वी स्वतःला फसवू नका, तर मोकळ्या मनाने या चाचणीत सहभागी व्हा. कल्पना करा की, तुम्हाला एका परदेशी विमानतळावर अडकवण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला फक्त एक फोन कॉल करण्याची परवानगी दिली आहे. आता सांगा, तुम्ही कुणाला फोन कराल? तुमच्या गृहिणी पत्नीला, जी घाबरून जाईल? 70 वर्षांच्या वडिलांना? की तुमच्या भावाला, जो एका प्रभावशाली सरकारी पदावर आहे. जर तुम्हाला ‘हाय-एजन्सी’चा अर्थ माहीत असेल, तर तुम्ही तुमच्या भावालाच फोन कराल. कारण कदाचित तोच तुमच्या आयुष्यातील ‘सर्वात जास्त एजन्सी’ असलेली व्यक्ती असेल. तो घाबरणार नाही. कदाचित तुमच्याकडून डझनभर प्रश्न विचारून घेईल. यंत्रणेला दोष देत बसण्याऐवजी समस्या सोडवण्याचे मार्ग शोधू लागेल. ‘हाय-एजन्सी’ ही एक अशी मानसिक स्थिती आहे, ज्यात तुम्ही एक निष्क्रिय प्रवासी न बनता तुमच्या आयुष्याचे चालक स्वतः बनता. ही विचारसरणी परिस्थिती किंवा मर्यादा जशा आहेत तशा स्वीकारण्यास नकार देते. यामध्ये असा आंतरिक विश्वास असतो की, तुमच्या कृतीचा परिणामांवर प्रभाव पडतो. ‘हाय-एजन्सी’ व्यक्तीमध्ये खालील गुण दिसतात: 1. कृतीची तत्परता: त्यांना स्पष्ट परवानगी, आदर्श परिस्थिती किंवा अचूक सूचनांची वाट पाहावी लागत नाही. समस्या समोर आली की ते त्वरित कामाला लागतात.
2. पूर्ण जबाबदारी घेणे: ते समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी स्वतः घेतात, मग ती त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरची का असेना.
3. संसाधनांचा वापर: ‘हे अशक्य आहे’ असे म्हणून थांबण्याऐवजी, ते विचार करतात की ‘चला, दुसरा मार्ग आजमावून पाहू.’ हवा तो निकाल मिळेपर्यंत ते नवनवीन मार्ग अवलंबत राहतात.
कामाच्या ठिकाणी ‘हाय-एजन्सी’ मानसिकता कशी विकसित करावी? नियमित व्यायामाने शरीर कमावतो तसे, मुद्दाम अंगीकारलेल्या काही सवयी ‘हाय-एजन्सी’ विकसित करू शकतात. यासाठी पाच क्षेत्रांवर काम करणे आवश्यक आहे:
1. समस्या नको, उपाय घेऊन जा: आपल्या मॅनेजरकडे समस्या घेऊन जाण्यापूर्वी किमान दोन व्यावहारिक उपाय सुचवा.
2. नियमांना मार्गदर्शक समजा: वेगाने निकाल देण्यासाठी कठोर कॉर्पोरेट प्रक्रियांचा वापर कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीत राहून आपल्या सोयीनुसार करा.
3. अडथळ्यांवर मात करा: जर एखाद्या सहकाऱ्याने ‘नाही’ म्हटले, तर इतर पर्याय, डेटा किंवा मार्ग शोधा.
4. मर्यादित संसाधनांत काम करा: बजेट कमी असेल तरीही मोफत टूल्सचा वापर करून उच्च दर्जाचे उत्पादन बनवा.
5. धोका पत्करा: जेव्हा नेतृत्व उपलब्ध नसेल, तेव्हा आवश्यक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्या. ‘हाय-एजन्सी’ची मूळ संकल्पना ही आहे की, आपले आयुष्य बदलण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे. याचा स्वीकार करणे हा नैराश्य आणि हतबलतेवरचा उत्तम उपाय ठरू शकतो. सतत काम करण्याच्या या युगात, नेमके आपले लक्ष कुठे असावे हे ठरवणे, हाच आपला ‘हाय-एजन्सी’चा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. फंडा असा की, ‘हाय-एजन्सी’ ही एक मूल्यनिरपेक्ष संज्ञा आहे, ती सकारात्मकही नाही आणि नकारात्मकही नाही. हे अशा व्यक्तीचे वर्णन आहे, जो धोका पत्करूनही कृती करतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



