नाशिक: प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरासह परिसरामध्ये हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आणि मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या मुख्य रस्त्यावरून बुधवारी रात्रीच्या सुमारास काही भाविक कडक पावसात चालले असताना, वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की एका घराचे लोखंडी पत्रे (टिन शेड) सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पूर्णपणे उखडले गेले आणि हवेत सुसाट उडत थेट रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर येऊन कोसळले.
या अचानक घडलेल्या थरारक घटनेमुळे रस्त्यावर चालणाऱ्या भाविकांमध्ये एकच तारांबळ उडाली. हा संपूर्ण भयानक प्रकार जवळच एका घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये अगदी स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये दिसत आहे की, रंगीबेरंगी रेनकोट घालून काही भाविक हळूहळू रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना अचानक हा लोखंडी पत्रा हवेतून येऊन त्यांच्यावर आदळतो, ज्यामुळे ते खाली कोसळतात. या दुर्दैवी दुर्घटनेत एकूण तीन भाविक जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकाचे नाव अमित सुभाष आढे (रा. यवतमाळ) असे असून, त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी व तरुणांनी कोणतीही वेळ न घालवता धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी दुचाकीवरून व इतर वाहनांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात (सव्-डिस्टिक्ट हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असलेल्या अमित आढे याला पुढील विशेष उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ प्रशासनाला मदतीचे आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या संपूर्ण प्रकरणावर व जखमींच्या उपचारावर स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




