ते दिवस आठवतात, जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करत असे? तेव्हा प्रवास म्हणजे केवळ एखाद्या मुक्कामावर पोहोचणे नसायचे. तो एक सोहळा असायचा, त्यात एक थ्रील असायचे आणि बहुतांश वेळा ती एक चालती-फिरती पिकनिकच असायची. लहानपणी आम्ही ट्रेनच्या खिडकीला चिकटून बसायचो आणि पुढच्या स्टेशनची वाट पाहायचो. ट्रेनचा वेग कमी होताच आमचे तरुण वडील प्लॅटफॉर्म नसलेल्या स्टेशनवर उतरायचे. आम्हा मुलांना खाली उतरण्याची परवानगी नसायची. ते फूड-कार्टच्या दिशेने धावायचे आणि आमच्यापैकी कोणीतरी ओरडायचे, ‘बाबा, ते नाही! त्याच्या बाजूला जे पिवळे पाकीट आहे, ते!’ असे करून आम्हाला नेमके कोणते बिस्किट हवे आहे, हे आम्ही अचूक सांगायचो. कोळशाच्या इंजिनची लांब शिट्टी वाजण्यापूर्वी वडिलांना परत यावे लागायचे. शिट्टी वाजायची, तेव्हा आम्ही सगळे मिळून गाऊ लागायचो- ‘गाडी बुला रही है, सीटी बजा रही है!’ आजूबाजूला बसलेले प्रवासी आमच्या या बालिशपणावर हसायचे. 1960 च्या दशकातील प्रवास असाच असायचा : खा, वरच्या बर्थवर चढा, काही मिनिटे झोपण्याचे नाटक करा, मग खाली उतरून पुन्हा खा. वडील बिस्किटाचे पाकीट आमच्या हातात देताच आम्ही त्यावर तुटून पडायचो आणि दातांनी त्याचे रॅपर फाडायचो. तेव्हा आई लगेच आमच्या पाठीत धपाटा घालायची आणि म्हणायची, ‘सगळंच तोंडाला लावाल तर आजारी पडाल!’ ती पाकीट हिसकावून स्वतःजवळ ठेवायची, फ्लास्कमधून स्टीलच्या ग्लासमध्ये गरम दूध ओतायची आणि आम्ही बिस्किटे त्यात बुडवून खाऊ लागायचो. आम्हाला कधीच पर्वा नसायची की बिस्किट कोणत्या ब्रँडचे आहे, त्यात कोणते घटक आहेत किंवा किती कॅलरी आहेत. रिकामे रॅपर पाहून आमचा एकच प्रश्न असायचा : आणखी एक बिस्किट उरले आहे का? जर उत्तर ‘नाही’ असेल, तर रिकामे पाकीट लगेच चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले जायचे. कधी कधी ते पाकीट हवेत उडून समोर बसलेल्या काकांच्या खिडकीतून आत जायचे आणि ते पकडायचे. तेव्हा ते आमच्याकडे अशा नजरेने पाहायचे, जणू काही म्हणत आहेत : ‘बॅड हॅबिट्स’. आम्हीही लगेच ‘सॉरी’ म्हणायचो. त्या काळात ट्रेनचा डबा एखाद्या छोट्याशा वस्तीसारखा असायचा. आम्ही सहा सीट असलेल्या कोणत्याही डब्यात जायचो आणि तिथे अगदी अनोळखी लोकही आमचे स्वागत करायचे. कोणी आम्हाला खाण्यासाठी काहीतरी द्यायचे. आम्ही नम्रपणे नकार द्यायचो आणि पळून आमच्या आई-वडिलांकडे परत यायचो. आता 2026 मध्ये येऊया. गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून प्रवास करताना अचानक मला जाणवले की, घरातून बाहेर पडल्यापासून मी एकाही व्यक्तीशी बोललो नव्हतो. टॅक्सी प्री-पेड होती, त्यामुळे ड्रायव्हरने मला निमूटपणे एअरपोर्टच्या प्रवेशद्वारावर उतरवले. डिझियात्रा ॲपने माझा चेहरा ओळखला, त्यामुळे एअरपोर्टच्या सुरक्षेसाठी तैनात सीआरपीएफ जवानांशीही मला बोलण्याची गरज पडली नाही. इंडिगोच्या किऑस्कवर मी माझी सुटकेस स्वतःच चेक-इन केली. मशीनने दोन कागद काढले - एक बोर्डिंग पास आणि एक बॅगेज टॅग. सुरक्षा तपासणीदरम्यान आणि नंतर बोर्डिंग गेटवरही कॅमेऱ्यांनी मला ओळखले. कोणत्याही संवादाची गरज नव्हती. मी माझ्या जागेवर पोहोचलो, नॉईज-कॅन्सलिंग हेडफोन लावले, गळ्यात -डु नॉट डिस्टर्ब’ची पाटी लटकवली आणि डोळे मिटून घेतले. माझे डोळे तेव्हाच उघडले, जेव्हा विमान उतरताना मला एक हलकासा धक्का बसला. घरातून बाहेर पडल्यानंतर मी जे पहिले वाक्य बोललो, ते एअरपोर्टच्या बाहेर माझ्या ऑफिसच्या ड्रायव्हरसोबत होते. आधुनिक प्रवासात तुमचे स्वागत आहे. हा प्रवास अत्यंत कार्यक्षम असतो. यात कुठेही कटकट नसते. हा प्रवास आश्चर्यकारकपणे सोयीस्कर आहे. पण याच नादात तो खूप एकटेपणानेही भरून गेला आहे. कदाचित आपल्याला 1960 च्या दशकातील प्रवासाचा थोडासा भाग आपल्या 2026 च्या आयुष्यात परत आणण्याची गरज आहे. नाही, आपल्याला कोळशावर चालणारी इंजिने परत आणण्याची गरज नाही, आणि धुराने भरलेले डबे व कडक बर्थही नकोत. पण त्या काळातील संवाद आपल्याला नक्कीच पुन्हा परत आणावे लागतील. ते अनोळखी लोक, जे हसून भेटायचे. ती मुले, जी फिरता फिरता दुसऱ्या एखाद्या बर्थवर जाऊन पोहोचायची. आणि ते काका, ज्यांनी आमचे नावही न जाणता आम्हाला हे शिकवले होते की चालत्या ट्रेनच्या खिडकीतून वस्तू बाहेर फेकणे ही वाईट सवय आहे.
फंडा असा की - तंत्रज्ञानाने आपला प्रवास वेगवान केला आहे. पण आता कदाचित आपल्याला त्याला पुन्हा मानवी बनवण्याची गरज आहे. सगळीकडे ‘एकटे’ प्रवास करणे बंद करायला हवे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
महाराष्ट्र
- सातारा: नौसिकांनी अनुभवला शूरांच्या जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा! 'वेस्टर्न नेव्हल कमांड'च्या दुचाकी रॅलीचे साताऱ्यात उत्साहात भव्य स्वागत
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
- अमरावती: मस्तकी मानाचा मुकुट! १७ वर्षीय कुमकुम मोहोडचा आशियाई आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पराक्रम, ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
अंबेडकरनगरमध्ये व्होल्वो बस-ट्रकची भीषण धडक; ४ प्रवाशांचा मृत्यू
सुरत-उदयपूर वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?



























Subscribe to my channel




