मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत असून, मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आणि तिचे संस्थापक अभिजित दिपक यांच्याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील आंदोलनांच्या आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आल्याचा दावा केला आहे. यासोबतच या आंदोलनांमध्ये आणि संघटनांमध्ये देशविरोधी 'तुकडे-तुकडे गँग'चा सहभाग असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा गंभीर आरोप: पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, "कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपक यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मावळ्यांच्या जागी 'झुरळे' (कॉकरोच) दाखवण्यात आले आहेत. जे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यासाठी खांद्याला खांदा लावून लढले, त्यांना अशा प्रकारे झुरळांच्या स्वरूपात दाखवणे म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महान मावळ्यांचा अत्यंत जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे." मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोणताही शिवप्रेमी आणि देशभक्त नागरिक हा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच याप्रकरणी अभिजित दिपक यांनी महाराष्ट्राची तात्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली.
'तुकडे-तुकडे गँग' आणि देशविरोधी शक्तींचा सहभाग: यावेळी बोलताना नितेश राणे यांनी आंदोलनामागच्या हेतूंवर आणि त्यात सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीजेपीच्या या आंदोलनात किंवा व्यासपीठावर 'तुकडे-तुकडे गँग'चे सदस्य सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला. शबाना आझमी, नसरुद्दीन शाह, विशाल ददलानी यांसारख्या व्यक्तींवर ताशेरे ओढत ते या गँगचे ब्रँड अॅम्बेसडर असल्याचा दावा त्यांनी केला. या देशविरोधी विचारांच्या आणि उमर खालिदसारख्या घटकांचे समर्थन करणाऱ्या शक्तींना राजकीय आश्रय देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोपही राणेंनी केला. बाळासाहेब ठाकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांपासून फारकत घेऊन अशा जिहादी प्रवृत्तींना कवटाळणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!


























Subscribe to my channel




