नागपूर: उपराजधानी नागपूरमधून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरीवरून कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका संतापलेल्या माजी कर्मचाऱ्याने थेट मालकाच्या मोटर सायकल गॅरेजला आग लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी येथील बाबा दीपनगर भागात शुक्रवारी (ता. २) पहाटेच्या सुमारास ही भयानक आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या आणि उभ्या असलेल्या तब्बल २० दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाल्या आहेत. या आगीत सुमारे पाच लाख रुपयांचे गॅरेजमधील साहित्यासह दुचाकींचे नुकसान झाले आहे, तर गॅरेजच्या शेजारी असलेल्या एका क्लिनिकचेही सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राप्त सविस्तर माहितीनुसार, बँक कॉलनीत बाबा दीपनगर येथे राहणारे सतीश यादव (वय ४२) यांचे ‘दिवेश होंडा सर्व्हिस’ नावाचे मोटर सायकल रिपेरिंगचे गॅरेज आहे. राजू महेंद्रकर हा तरुण यापूर्वी या गॅरेजमध्ये कामाला होता. मात्र, काही कारणास्तव सतीश यादव यांनी राजू महेंद्रकर याला नोकरीवरून काढून टाकले होते. आपल्याला कामावरून काढून दिल्यामुळे राजूच्या मनात मालकाबद्दल तीव्र राग आणि द्वेष निर्माण झाला होता. याच रागाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गॅरेजमधून अचानक धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागल्याने परिसريس एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशामक दलाला पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत गॅरेजमधील सुमारे २० मोटारसायकल जळून खाक झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी केली असून, त्यात एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार असलेल्या माजी कर्मचाऱ्याचा कसून शोध घेतला जात आहे.
शहर
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
महाराष्ट्र
- अमरावती: मस्तकी मानाचा मुकुट! १७ वर्षीय कुमकुम मोहोडचा आशियाई आर्चरी स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पराक्रम, ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला
- मुंबई: पाण्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी आणि टँकर चोरी थांबवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणणार 'ओटीपी' आधारित डिजिटल धोरण
- मुंबई: 'कॉक्रोच जनता पार्टी' आणि अभिजित दिपकेंवर नितेश राणे यांचे गंभीर आरोप; छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याचा दावा करत 'तुकडे-तुकडे गँग'शी जोडले कनेक्शन
- मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश! महाराष्ट्र शासनाकडून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे आदेश जारी
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?


























Subscribe to my channel




