जिंतूर-जालना महामार्गावर बुधवारी मध्यरात्रीनंतर काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गंगाखेड येथून उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या 6 मित्रांच्या एर्टिगा कारला अकोली नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार पुलाच्या सिमेंट बीमला इतक्या जोरात धडकली की त्यामध्ये चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ऐन प्रवासाच्या सुरुवातीलाच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेड येथील ६ मित्र एर्टिगा कारने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर दर्शनासाठी निघाले होते. बुधवारी पहाटे १२.१५ वाजता जिंतूर शहराजवळील अकोली नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर भरधाव कार पुलाच्या सिमेंट बीमला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मृत्यू झालेले चारही तरुण २६ ते २८ वयोगटातील होते.
मृतांची नावे आली समोर
या भीषण अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले चारही तरुण गंगाखेड परिसरातील आहेत. ऐन उमेदीच्या वयात काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात रोहन संजय राठोड (२८), बालाजी आश्रोबा ओटी (२६), अभिजीत शिंगाडे (२७) आणि बालाजी घोरपडे (२८) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मित्र उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना जिंतूरजवळ त्यांच्यावर हा काळाचा घाला आला.
या अपघातात गणेश गोपाळ रोकडे आणि अन्य एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
पुढील तपास सुरू
या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे प्रयत्न करावे लागले. यावेळी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. या अपघाताच्या प्राथमिक तपासात चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
महाराष्ट्र
- पुणे: आंदोलन म्हणजे 'युद्धात जिंकलो आणि तहात हरलो' राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची निव्वळ दिशाभूल; नेत्या सुषमा अंधारेंचा घणाघात
- पुणे: कात्रज बोगद्याजवळ काळाचा घाला! रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सोबती गंभीर जखमी
- नाशिक: मोबाईलग्रस्त पिढीतील कन्येची ६ पुस्तकांची 'किमया'! नाशिकच्या १४ वर्षीय किमाया उगलेचा कौतुकास्पद प्रवास
- मुंबई: ज्ञानेश कुमार यांना अटक करा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचा तीव्र आक्रोश; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा केंद्र सरकारवर घणाघात
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
























Subscribe to my channel



