छत्रपती संभाजीनगर: 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) चे संस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक अभिजीत दीपके आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी उडाल्याची एक मोठी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी दूरদূরवरून येणाऱ्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून विनाकारण रोखले जात असल्याचा व उद्धट वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत अभिजीत दीपके पोलीस अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. इतकेच नव्हे तर, "मी कोणाला भेटायचे हे ठरवणारे तुम्ही कोण?" असा सवाल करत त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला थेट आपल्या घरातून आणि परिसराबाहेर जाण्यास सांगितले.
नेमकी काय आहे घटना?
दिल्लीतील जंतरमंतरवरील गाजलेले विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या स्थापनेमुळे देशभरात चर्चेत आलेले अभिजित दीपके काही दिवसांपूर्वीच दीर्घ संघर्षानंतर आपल्या घरी छत्रपती संभाजीनगर येथे परतले आहेत. दरम्यान, त्यांना भेटण्यासाठी देशाच्या विविध भागांतून तरुण, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या सिडको वाळूज महानगर परिसरातील निवासस्थानी सातत्याने हजेरी लावत आहेत. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या घरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परंतु, ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सुरक्षेच्या नावाखाली भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची अतिचौकशी करण्यास सुरुवात केली. "तुम्ही इथे का आलात? कशासाठी आलात? कुठून आलात?" अशी विचारणा करत नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखून धरण्यात आले तसेच त्यांना अभिजीत दीपके यांची भेट घेऊ दिली जात नाही, असा आरोप केला जाऊ लागला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे तिथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
पोलीस अधिकाऱ्याशी शाब्दिक चकमक:
जेव्हा हा प्रकार अभिजीत दीपके यांच्या निदर्शनास आला, तेव्हा ते अत्यंत संतप्त झाले. त्यांनी तात्काळ बाहेर येत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) जाब विचारण्यास सुरुवात केली. "मला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे ठरवणारे तुम्ही पोलीस कोण?" अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला खडे सुनाविले.
तसेच एकाच वेळी सर्वांना आत सोडण्याबाबत किंवा नागरिकांशी उद्धट वर्तन करण्याबाबत पोलिसांनी मनमानी करू नये, असे स्पष्ट फर्मावत दीपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला कडक शब्दांत फटकारले. या वादानंतर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तिथून निघून जाण्यास सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यावर विविध स्तरातून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणी दीपके यांच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही तक्रार नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


