सातारा: माणदेश परिसरामध्ये पट्टेरी तरस आणि येथील खुल्या गवताळ परिसंस्थेच्या संवर्धनासाठी अविरत कार्य करणारे युवा वन्यजीव संशोधक व संवर्धक चिन्मय प्रकाश सावंत यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघ' (IUCN) अंतर्गत येणाऱ्या प्रजाती जतन आयोगाच्या प्रतिष्ठित 'तरस (हाइना) स्पेशालिस्ट ग्रुप'च्या सदस्यपदी त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या जागतिक नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून प्रभावी संवर्धन मॉडेल: चिन्मय सावंत यांनी गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील माणदेश (माण तालुका) भागात स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन एक अत्यंत प्रभावी समुदायआधारित (Community-based) संवर्धनाचे मॉडेल राबवले आहे. या भागातील जैवविविधतेचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे, पट्टेरी तरसांच्या अधिवासाचे संरक्षण करणे, वन्यजीव निरीक्षण आणि ग्रामीण भागात जनजागृती मोहिमा राबवणे या माध्यमातून त्यांनी मानवी समाज व वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करून सहअस्तित्वाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांच्या या धडाडीच्या आणि निस्वार्थ कार्यामुळे माणदेशातील वन्यजीव संरक्षणाला मोठे बळ मिळाले आहे.
जागतिक स्तरावर भारताचा बहुमान: 'आंतरराष्ट्रीय निसर्गसंवर्धन संघाचा' (IUCN) हा विशिष्ट समूह जगभरातील तरसांच्या विविध प्रजातींचे संरक्षण, वैज्ञानिक संशोधन, संवर्धन धोरणांची अचूक आखणी आणि जागतिक स्तरावर माहितीची देवाणघेवाण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. या जागतिक समितीमध्ये जगभरातील १३ देशांमधील केवळ २० निवडक संशोधक व तज्ज्ञांना स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, या निवडक आणि प्रतिष्ठित जागतिक गटात स्थान मिळवणारे चिन्मय सावंत हे भारतातील केवळ दोन सदस्यांपैकी एक ठरले आहेत, जी देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.
या निवडीबद्दल बोलताना चिन्मय सावंत यांनी सांगितले की, "ही जागतिक संधी केवळ माझ्या वैयक्तिक कार्याचा सन्मान नसून, याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याची आणि माणदेशातील अद्वितीय खुल्या परिसंस्था व पट्टेरी तरसांच्या संरक्षणासाठी माझी बांधिलकी अधिक दृढ करण्याची मला संधी मिळाली आहे." त्यांच्या या यशाबद्दल पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


