बंगळुरु: बेळगाव जिल्ह्यात एका माजी सैनिकाच्या मृत्यूचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ४५ वर्षीय संदीप मंजरीक यांचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. दोन कोटी रुपयांची विमा रक्कम मिळवण्याच्या उद्देशाने पत्नीने कट रचून पतीची हत्या केल्याच आरोप होत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मयत माजी सैनिकाची बॉडी परत बाहेर काढली.कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांनंतर, पोलिसांनी शुक्रवारी संदीप मंजरीक यांची बॉडी दफनविधीनंतर तब्बल तीन महिन्यांनी पुन्हा बाहेर काढली. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीला एका मंदिराच्या जत्रेतून परतत असताना संदीप यांचा रस्ते अपघात झाला होता. त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
पत्नी, प्रियकरावर हत्येचा आरोप
संदीप यांच्या नातेवाईकांनी त्यांची पत्नी सुमा मंजरी आणि तिचा कथित प्रियकर पुंडलिक डोंबर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. त्यानंतर या तपासाला एक वेगळे वळण लागले. रुग्णालयात उपचार सुरु असताना ग्लुकोजच्या ड्रीपद्वारे संदीप यांना विष देण्यात आले असावे, या दाव्याचाही पोलीस तपास करत आहेत.
प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने गेम फिरला
प्रियकर पुंडलिकने एक 'सेल्फी व्हिडिओ' शेअर केल्यानंतर या आरोपांना अधिक बळकटी मिळाली. या व्हिडिओमध्ये त्याने दावा केला की, सुमाने तिच्या पतीच्या २ कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीबद्दल त्याच्याशी चर्चा केली होती आणि विमा रक्कम मिळाल्यावर आपण बेळगावमध्ये स्थायिक होऊ शकतो, असे म्हटले होते. संदीप यांच्या मृत्यूपूर्वी सुमाने त्याला कीटकनाशक आणण्यास सांगितले होते, असा दावाही पुंडलिकने केला.
कुटुंबीयांचे आरोप लक्षात घेऊन पोलिसांनी संदीप यांचं शव पुन्हा बाहेर काढलं. त्यांचे अवशेष पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सुमा मंजरी आणि पुंडलिक डोंबर या दोघांचीही चौकशी केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




