
Pune : पुणे जिल्ह्यातील इंदापूरजवळ पिंपळे इथं भिगवण-बारामती राज्य मार्गावर रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला आणि ट्रॅक्टर ट्रकखाली शिरल्याने त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक आगीत होरपळून ठार झाला आहे. ट्रकचालक मात्र घटनास्थळावरून पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. या आगीमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती. भिगवण पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, भिगवणकडे जाणारा ट्रॅक्टरआणि बारामतीच्या दिशेने येणारा ऊस वाहतूक करणारा ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की ट्रॅक्टर ट्रकखाली पूर्णपणे शिरला. यामुळे ट्रॅक्टरचे दोन भाग झाले. दुर्दैवाने, ट्रॅक्टर चालक वाहनातच अडकला होता. अपघाताच्या धक्क्याने ट्रकही उलटला. या भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला आणि आगीच्या भयंकर ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले.
|
|
या आगीत ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो जागीच जळून खाक झाला. परंतु, ट्रकचालक घटनास्थळी आढळून आला नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ट्रकचालक बचावासाठी तिथून पळून गेला. या संपूर्ण घटनेत दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून ट्रक आणि ट्रॅक्टरसह चालकही या आगीत जळून खाक झाला. ट्रकच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या आगीमुळे ट्रकचंही मोठे नुकसान झालं.
दरम्यान, या अपघातामुळे भिगवण-बारामती रोडवर दोन तासांहून अधिक काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. भिगवण पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, ट्रॅक्टर चालकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




