
Pune : मेट्रो टप्पा - दोन खडकवासला ते हडपसर-खराडी मेट्रो मार्गिके अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो मार्गिकांना गुरुवारी राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे आता या मार्गिका मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवल्या जाणार आहेत. या दोन मार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवड या वाढत्या उपनगरांना मेट्रो सेवा जोडल्याने वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जलद वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मार्गिकांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने मान्यता दिल्याचा शासन आदेश गुरुवारी काढला. मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण १६ किलोमीटर लांबीच्या असून, त्यात एकूण १४ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही उपमार्गिकांसाठी पाच हजार ७०४ कोटी रुपये खर्च येणार आहे. हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग ११.१०२ किलोमीटर लांबीचा असेल.
|
Pune : पुणे-मुंबई मार्गावरील १७ गाड्या रद्द; लोकल सेवेलाही फटका, संपूर्ण यादी जाहीर |
हडपसर बस डेपो ते सासवड रोड हा मार्ग ५.५५७ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने जमीन, भूसंपादन आणि पुर्नवसन यासाठी ४०३. ३६ कोटी रुपये महामेट्रोला देण्याचे निर्देश दिले आहेत. हे मार्ग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता महामेट्रो व महापालिकेने घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




