राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आणखीसहा नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आम आदमी पक्षातनिर्माण झालेली उलथापालथ ही केवळ भ्रष्टाचारविरोधीआंदोलनातून जन्मलेल्या या पक्षाच्या ऱ्हासाची सुरुवातनाही. हा मध्यमवर्गाच्या स्वप्नाचा भंगही आहे. त्यातश्रीमंत, बाहुबलींच्या हातातून सत्ता काढून राजकारणालाकाही लोकांच्या स्वार्थाऐवजी व्यापक सामाजिक हिताचेसाधन बनवण्याची या वर्गाची इच्छा होती. राज्यसभेत राघव चड्ढा ‘आप’चा चमकता चेहरा बनलेहोते. यावरून भारतीय मध्यमवर्गाशी त्यांच्या पूर्वीच्यापक्षाचे किती घट्ट नाते होते, हे दिसून येते. हा वर्ग होतात्या काळातील राजकारणाला कंटाळला होता आणि काहीतरी नवे व अर्थपूर्ण घडवू इच्छित होता. राघव यांनी 13 वर्षे टीका केली, त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेशकेला आहे. यावरून आजचे राजकारण किती पोकळझाले आहे, हे स्पष्ट होते. येथे आदर्श आणि निष्ठा यांना वैयक्तिक स्वार्थ आणि अति महत्त्वाकांक्षेच्या वेदीवरबळी दिले जाते. मात्र, केवळ राघव यांनाच दोष देणेयोग्य ठरेल का? ते अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षात कालांतराने निर्माण झालेल्या विसंगतींचे प्रतीक आहेत. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेससारख्या मोठ्यापक्षांना हरवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. तेव्हा मध्यमवर्गाच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. कार्यक्षमता,पारदर्शकता आणि सहभागाची अपेक्षा ठेवणाऱ्यामध्यमवर्गाच्या जोरावर ‘आप’ आणि केजरीवाल सत्तेतआले. त्यांनी लोकांना शासनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याचेआश्वासन दिले होते. केजरीवाल यांचे आर्थिक मॉडेलपारंपरिक पक्षांसारखे कॉर्पोरेट निधीवर आधारित नव्हते.त्यांनी लाखो समर्थकांच्या छोट्या-छोट्या देणग्यांवरविश्वास ठेवला होता. ते नव्या प्रकारच्या राजकारणाचेस्वप्न पाहत होते. नायब राज्यपालांशी सततच्यासंघर्षामुळे केजरीवाल यांच्यासमोर अडचणी होत्या, हेखरे असले तरी ते स्वतःही सत्तेच्या मोहापासून दूर राहूशकले नाहीत. साधेपणाने सरकारी निवासात राहण्याचेआश्वासन असूनही त्यांनी स्वतःसाठी मोठा बंगलाउभारला. राजधानीत पक्ष मजबूत करण्याआधीच त्यांचीमहत्त्वाकांक्षा दिल्लीच्या बाहेर गेली होती. हरियाणा,पंजाब, गुजरात आणि गोवा अशा राज्यांकडे त्यांनी लक्षवळवले. या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा दुहेरी परिणामदिसला. त्यांचे जुने आणि विश्वासू सहकारी मध्येचत्यांच्यापासून दूर गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण,शाजिया इल्मी, अल्का लांबा, कुमार विश्वास आणिकपिल मिश्रा यांसारखी अनेक नावे यामध्ये आहेत.पक्षाचा विस्तार करण्यासाठी अधिक संसाधनांची गरजहोती. देणगीआधारित आर्थिक मॉडेल आणिकार्यकर्त्यांची ताकद दिल्ली जिंकण्यासाठी पुरेशी ठरली,पण मोठ्या राज्यांमध्ये वेगाने विस्तार करण्यासाठी तीअपुरी पडली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्यानिकटवर्तीय सल्लागारांविरोधात ईडी आणिसीबीआयच्या चौकशा सुरू झाल्या. 2025 च्या दिल्लीविधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्यासहअनेक नेत्यांना तुरुंगात जावे लागले. सीबीआयचेप्रकरण खालच्या न्यायालयाने फेटाळले. मात्र यागोंधळात 2025 मधील निवडणुकीतील पराभव निश्चितझाला होता. दिल्लीत ‘आप’चा आणि स्वतः केजरीवालयांचा त्यांच्या मतदारसंघात झालेला पराभव पाहता,सध्याचे पक्षांतर जवळपास अपेक्षितच होते. केजरीवाल,चड्ढा व ‘आप’ची ही कहाणी आजच्या राजकारणातीलउणिवांची आठवण करून देते. सत्तेला व्यक्तीपूजा,धनबल,बाहुबलाऐवजी सेवा आधारित बनवू इच्छिणाऱ्यामध्यमवर्गीय आदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.मानवी विकास व आधुनिक प्रगतीला समान महत्त्वमिळावे, अशी अपेक्षा असणाऱ्यांनी यातून धडा घ्यावा. केजरीवाल आणि ‘आप’चा राजकीय शेवट झाला,असे आत्ताच म्हणणे घाईचे ठरेल. मात्र राज्यसभेतीलपक्षाचा ऱ्हास दिल्लीत अशा प्रक्रियेला सुरुवात करूशकतो. त्याचा परिणाम पंजाबमध्येही दिसू शकतो.पुढील वर्षी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारसमोर पुढची मोठीनिवडणूक परीक्षा आहे. ‘आप’चा अंतर्गतविस्कळीतपणा हा बदलाची आशा बाळगणाऱ्या छोट्यापक्षांसमोरील आव्हानांनाही अधोरेखित करतो. ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) ‘आप’ची ही कहाणी आजच्याराजकारणातील उणिवांची ठळकआठवण करून देते. सत्तेला व्यक्ती पूजा,धनबल व बाहुबलाऐवजी सेवा आधारितबनवू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीयआदर्शवाद्यांसाठीही हा मोठा इशारा आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




