होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने ट्रम्प प्रशासनासमोर एक प्रकारची सराव परीक्षा ठेवली आहे. ती उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजेच तैवानवर चीनच्या संभाव्य हल्लाकिंवा नाकेबंदीविरोधात प्रतिकारशक्ती कायम ठेवण्यासाठी अमेरिकेला ही सामुद्रधुनी निर्णायकपणेपुन्हा खुली करावीच लागेल. होर्मुझ आणि तैवान या दोन्ही अरुंद समुद्री मार्गांच्याबंदीमुळे अर्थव्यवस्था 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत मागेजाऊ शकते. गेल्या दीड महिन्यात इराणने हॉर्मुझसामुद्रधुनीला तरंगत्या गोळीबार क्षेत्रात बदलले आहे.जहाजांची ये-जा कमी झाली आहे, तेलवाहू जहाजेभीतीने मार्गक्रमण करत आहेत आणि इराणी स्पीडबोट्सव ड्रोन समुद्री चाच्यांसारखे वागत आहेत. याठप्पपणामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आलीआहे. कारण जगातील तेल आणि द्रवीकृत नैसर्गिकवायूचा मोठा हिस्सा याच मार्गाने जातो. हे फक्तमध्यपूर्वेतील संकट नाही तर आशियातील संघर्षाचीरंगीत तालीम आहे. यातून चीनला तैवानविरोधातीलरणनीती आखण्याचे संकेत मिळत आहेत. तैवान खाडी होर्मुझसारखीच आहे, पण ती सेमीकंडक्टरसाठीमहत्त्वाची आहे. जगातील सर्वात प्रगत चिप्सपैकी 90 टक्क्यांहून अधिक उत्पादन तैवानची टीएसएमसी कंपनीकरते. ह्याच चिप्स एआय डेटा सेंटर्स, लढाऊ विमानेआणि स्मार्टफोनचे ‘मेंदू’ मानल्या जातात. परदेशीचिप्सवरील अवलंबित्वामुळे निर्माण होणारे राष्ट्रीयसुरक्षेचे धोके लक्षात घेऊन अमेरिकेने 2022 मध्ये‘चिप्स अँड सायन्स ॲक्ट’ मंजूर केला होता. जेणेकरूनउत्पादकांना देशातच कारखाने उभारण्यासाठी प्रोत्साहनमिळावे. तरीही टेक्सास, ओहायो आणि न्यूयॉर्कमध्येनव्या फॅब्रिकेशन युनिट्सची योजना असूनही अमेरिकाअजूनही मोठ्या प्रमाणावर चिप्सच्या आयातीवरअवलंबून आहे. अशा स्थितीत चीनने तैवानवर हल्लाकेला किंवा नाकेबंदी केली, तर 21 व्या शतकाचीतांत्रिक यंत्रणाच ठप्प होऊ शकते. जागतिक नुकसान110 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही केवळ मंदीनसेल, तर पुरवठा साखळीचा हृदयविकाराचा झटकाठरेल. शी जिनपिंग यांना चीनच्या इतिहासात फक्तइलॉन मस्कपेक्षा चांगल्या कार बॅटऱ्या बनवणारा नेताम्हणून ओळखले जावे, असे वाटत नाही. त्यांना माओत्से तुंग यांनी दिलेले ‘एक चीन’चे वचन पूर्ण करायचेआहे— कोणतीही अट नसलेला आणि कम्युनिस्टनेतृत्वाला आव्हान देणारा कोणताही बंडखोर बेटनसलेला चीन. शी यांना असे वाटले की तैवानवरीलहल्ल्यानंतर अमेरिकेने कारवाईत संकोच केला किंवातडजोड केल्यास अमेरिकेची प्रतिकारशक्ती संपेल.जगातील सर्वात शक्तिशाली नौदलही जर एकाकमकुवत प्रादेशिक शक्तीसमोर तेलवाहू जहाजांनासुरक्षितपणे बाहेर काढू शकत नसेल, तर तैवानवरीलचीनी नाकेबंदी तोडण्यासाठी अमेरिका आपलीविमानवाहू नौका, पाणबुड्या आणि हजारो सैनिकांचाजीव धोक्यात घालेल, यावर शी का विश्वास ठेवतील?गेम थिअरीमध्ये याला ‘विश्वसनीय बांधिलकी’ म्हटलेजाते. म्हणजेच विरोधकाला खात्री असली पाहिजे कीतुम्ही बोलल्याप्रमाणे कृती कराल. तसे झाले नाही, तरसंपूर्ण खेळच बिघडतो. विश्वासार्हता एकदा गमावली,तर ती परत मिळवणे सोपे नसते. या समस्येचा उपाय कठीण आहे, पण स्पष्ट आहे.अमेरिकेने हॉर्मुझ सामुद्रधुनी निर्णायकपणे पुन्हा खुलीकरावी. यासाठी सामुद्रधुनीत एस्कॉर्ट, माइन-स्वीपर्सतैनात करणे, हल्ल्याच्या ठिकाणांवर कारवाई करणेआणि इराणच्या टोलबूथ बेटांवर नियंत्रण मिळवणेआवश्यक ठरेल. 2020 मध्ये ग्रीस, इजिप्त, पॅलेस्टिनीनॅशनल अथॉरिटी आणि इस्रायल यांनी इतर देशांसहईस्ट मेडिटेरेनियन गॅस फोरमची स्थापना केली होती,जेणेकरून नव्या गॅस साठ्यांचा उपयोग करता येईल.दुर्दैवाने, बायडेन प्रशासनाने इस्रायल ते युरोप प्रस्तावितपाइपलाइनसाठी अमेरिकेचा पाठिंबा मागे घेतला.प्रत्यक्षात हा हॉर्मुझवरील अवलंबित्व कमी करणारामहत्त्वाचा प्रकल्प ठरू शकला असता. अमेरिकेसमोर पर्याय स्पष्ट आहे— स्वतःच्या ताकदीनेहोर्मुझ खुला करा. अन्यथा शी तैवानवरील हल्ल्याचीतयारी करताना पाहा. सकारात्मक बाब म्हणजेअमेरिकेकडे सर्वात घातक नौदल आहे आणि अशीआर्थिक ताकदही आहे. ती कोणत्याही प्रतिस्पर्ध्यालामागे टाकू शकते. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) चीनने तैवानवर हल्ला केला किंवानाकेबंदी केली, तर 21 व्या शतकाचीतांत्रिक ‘नर्व्हस सिस्टिम’च ठप्प होऊशकते. जागतिक नुकसान 10 ट्रिलियनडॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही केवळमंदी नसेल, तर पुरवठा साखळीचा‘कार्डियाक अरेस्ट’ ठरेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




