
Maharashtra : आपल्या महाराष्ट्राला निसर्गाच्या सौंदर्याच्या अप्रतिम छटांचं सौभाग्य प्राप्त झालंय. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तुम्हाला निसर्गाचं वेगळंच सौंदर्य बघायला मिळेल. मात्र महराष्ट्राच्या एका कोपऱ्यात दडलेलं असं एक गाव आहे ज्याबाबत कदाचितच तुम्हाला माहिती असेल. येथून तुम्हाला निसर्गाचा नवा आविष्कारच बघायला मिळेल. यंदा महाराष्ट्रदिनी तुम्ही या ठिकाणाला आवर्जून भेट द्यायला हवी.
या गावाचं नाव 'फोफसंडी' असं आहे. अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव... उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे.. तर भन्नाट वारा.. वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्येच धुक्याच्या आगमनाने संपूर्ण परिसर आकाशमय... खोल दरीत असलेले ब्रिटिश अधिकारी फोफ साहेबांच्या नावाने परिचित असलेले हे फोफसंडी गाव! येथे सकाळी एक तास उशीरा सूर्य दिसतो. तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराच्या आड तो लुप्त होतो.
१२०० लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नागरिक जातात. या गावी काही घरात गॅस आहे, तर बहुतांशी लोक चुलीवर स्वयंपाक करतात.
गावात गिरण, जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय आश्रमशाळा आहे.
या गावाला फोफसंडी नाव का पडले?
७५ वर्षाचे भिवा पिलाजी वळे यांनी असे सांगितले की, फोफ नावाचा ब्रिटिश अधिकारी दर रविवारी गावात यायचा त्यामुळे गावाला फोफसंडी असे नाव पडले.
हे गाव आपल्या महाराष्ट्रात असून यंदाच्या महाराष्ट्रदिनी तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊन निसर्गाचा हा अनोखा आविष्का एकदा स्वत:च्या डोळ्याने बघायलाच हवा. तसेच या ठिकाणी तुम्हाला गावराण जेवणाचा आनंदही घेता येईल.
शहर
- पुण्यात पुन्हा गोळीबार! सहकारनगरमध्ये जिम मालक योगेश बनेकरवर ४ जणांचा जीवघेणा हल्ला; २ गोळ्या लागल्या, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
महाराष्ट्र
- पुण्यात पुन्हा गोळीबार! सहकारनगरमध्ये जिम मालक योगेश बनेकरवर ४ जणांचा जीवघेणा हल्ला; २ गोळ्या लागल्या, पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्या!
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!

























Subscribe to my channel



