
पुणे : दही, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणून दही, ताक आणि लस्सीच्या विक्री दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमूल आणि चितळे डेअरीने दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
केंद्र सरकारने दही, ताक आणि लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या वेष्टनांकित विक्रीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून अमूल आणि चितळेसारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या दही आणि ताकाच्या विक्री दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या हंगाम नसल्यामुळे लस्सीला फारशी मागणी नसल्यामुळे लस्सीच्या विक्री दरात वाढ करणे टाळले आहे. अमूलने एक किलो दह्याच्या पिशवीमागे चार रुपयांची वाढ केली आहे. ७० प्रति किलो मिळणारे दही आता ७४ रुपये प्रति किलोंवर गेले आहे. ताक ३० रुपये लिटर होते, त्यात दोन रुपयांची वाढ होऊन ते ३२ रुपयांवर गेले आहे. अशीच दही, ताकाच्या विक्रीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ चितळे समूहाने केली आहे.
गोवर्धन डेअरीचे प्रीतम शहा, ऊर्जा डेअरीचे प्रकाश कुतवळ आणि कात्रज डेअरीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर यांनी पाच टक्के जीएसटी आकारण्यामुळे दरवाढ करून ग्राहकांवर लगेच आर्थिक बोजा टाकण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. दही, ताक, लस्सीच्या प्लास्टिक पिशवीचे वेष्टन किंवा प्लास्टिक कपाच्या वेष्टनासाठी लागणाऱ्या कच्चा मालावर १८ टक्के जीएसटी भरावा लागत होता. यापूर्वी दही, ताकाच्या विक्रीवर कर नसल्यामुळे कर परताव्याचा फायदा घेता येत नव्हता. आता उत्पादनाच्या अंतिम विक्रीवर कर असल्यामुळे वेष्टनाच्या कच्च्या मालासाठी द्यावा लागलेला जीएसटी कर परताव्याने मिळणार आहे. त्यामुळे पाच टक्के जीएसटीचा खूप मोठा फटका बसेल, असे चित्र नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पुढील महिन्याभरात दूध संकलनात वाढ झाल्यानंतर दूध खरेदीदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी कोणतीही वाढ करणार नाही, असे प्रीतम शहा आणि प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
दैनंदिन संकलन १ कोटी ४० लाख लिटर
राज्याचे दैनंदिन दूध संकलन १ कोटी ४० लाख लिटर आहे. पावसाळय़ाचा परिणाम म्हणून हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढल्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्यात दूध संकलनात पाच ते सात टक्क्यांनी होऊन दूध संकलन १ कोटी ६० लाख लिटरहून अधिक होण्याची शक्यता दुग्ध व्यवसायाचे अभ्यासक प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केली. सध्या दूध पावडरचे दर प्रति किलो ७५ रुपये आणि बटरचे दर प्रति किलो ३८० रुपये असल्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरात कपात करण्यात आलेली नाही. ३.५ फॅटच्या गायीच्या दुधाची खरेदी ३३ ते ३५ रुपयांनी तर सहा फॅटच्या म्हशीच्या दुधाची खरेदी ४५ रुपये ३० पैसे दराने सुरू आहे.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला



























Subscribe to my channel
