छत्रपती संभाजीनगर: शहरातील जवाहर कॉलनी परिसरातून आतापर्यंतचा अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणारा सायबर गुन्ह्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेला सायबर चोरांनी थोडे-थोडके दिवस नाही, तर तब्बल दीड महिना 'डिजिटल अरेस्ट' (Digital Arrest) मध्ये ओलीस ठेवले होते. या दीड महिन्यांत भीती दाखवून तोतया अधिकाऱ्यांनी या वृद्धेकडून तब्बल ९३ लाख ५० हजार रुपये उकळले. ही वृद्ध महिला जेव्हा अमेरिकेत (US) राहणाऱ्या आपल्या मुलांकडे गेली, तेव्हा या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सायबर दरोड्याचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे.
असा रचला कट; तोतया आयपीएस बनून केला कॉल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी या वृद्धेच्या व्हॉट्सॲपवर (WhatsApp) एक अनोळखी कॉल आला. फोनवरील महिलेने आपण दिल्लीतून 'बीएसएनएल' (BSNL) अधिकारी बोलत असल्याचे सांगून या वृद्धेचे सिमकार्ड बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरले जात असल्याची भीती दाखवली. त्यानंतर तात्काळ हा कॉल एका व्हिडिओ कॉलवर ट्रान्सफर करण्यात आला. समोर पोलीस युनिफॉर्ममध्ये बसलेल्या एका व्यक्तीने स्वतःची ओळख दिल्लीचे आयपीएस अधिकारी 'सुनीलकुमार गौतम' अशी करून दिली.
दहशतवादी संबंधांची भीती आणि दीड महिना डिजिटल कैद
या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने वृद्धेला धमकावले की, "तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी संघटनांना निधी पुरवला जात आहे. तुमच्या नावावर सर्वोच्च न्यायालयाचे अटक वॉरंट निघाले आहे." यामुळे वृद्ध महिला प्रचंड घाबरली. चोरांनी तिला कोणालाही न सांगण्याची कडक ताकीद दिली आणि स्काईप (Skype) किंवा व्हिडिओ कॉलवरून २४ तास नजर ठेवून 'डिजिटल अरेस्ट' केले. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि चौकशीच्या नावाखाली या टोळीने वृद्धेला वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ९३ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
अमेरिकेत मुलांनी उघड केले सत्य
या मानसिक त्रासामधून जात असतानाच, ही वृद्ध महिला नियोजित दौऱ्यानुसार अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलांकडे गेली. तिथे गेल्यावरही तिची भीती कमी झाली नव्हती. मुलांनी तिच्या बदललेल्या वागणुकीबद्दल विचारणा केली असता तिने रडत रडत हा सर्व प्रकार सांगितला. मुलांनी तात्काळ तपास केला असता, तो आयपीएस अधिकारी आणि त्यांनी पाठवलेली सर्वोच्च न्यायालयाची नोटीस संपूर्णपणे बोगस असल्याचे समोर आले. मुलांच्या सांगण्यावरून आता छत्रपती संभाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात या आंतरराष्ट्रीय फसवणुकीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




