कान्स (फ्रान्स): फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा ७९ व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६' (Cannes Film Festival 2026) मधून महाराष्ट्रासाठी एक अतिशय अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते 'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी, अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरताना या दिग्गज जोडीने आपली मराठी संस्कृती आणि पारंपरिक बाज जपल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या रॉयल लूकने कान्स फेस्टिव्हलमध्ये उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'अभिजात मराठी'च्या ग्लोबल लाँचसाठी उपस्थिती
यंदा कान्स फेस्टिव्हलमध्ये 'अभिजात मराठी' या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे ग्लोबल लाँच करण्यात आले. याच खास सोहळ्यानिमित्त आणि मराठीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अशोक सराफ, निवेदिता सराफ, लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी, 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि केदार जोशी हे कान्समध्ये दाखल झाले आहेत. 'भारत पव्हेलियन'मध्ये या सर्वांनी हजेरी लावून मराठी पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने पुढे टाकले आहे.
पारंपरिक लूकने जिंकली जगभरातील प्रेक्षकांची मनं
कान्सच्या रेड कार्पेटवर पाश्चात्य आणि ग्लॅमरस कपड्यांची फॅशन पाहायला मिळत असताना, सराफ दांपत्याने मात्र मराठमोळा थाट पसंत केला. अभिनेते अशोक सराफ यांनी पांढऱ्या रंगाचा राजेशाही सूट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा देखणा लूक केला होता. तर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सुंदर हिरव्या रंगाची काठापदराची पारंपरिक पैठणी साडी नेसली होती. गळ्यात पारंपरिक दागिने, नाकात नथ आणि केसांत सुवासिक गजरा माळून जेव्हा निवेदिता सराफ रेड कार्पेटवर उतरल्या, तेव्हा त्यांच्या सौंदर्याने आणि साधेपणाने सर्वांनाच भुरळ पाडली.
अशोकमामांच्या 'त्या' कृतीची जगभर चर्चा!
रेड कार्पेटवर एन्ट्री करताच अशोक सराफ यांनी आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर्स आणि माध्यमांसमोर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रपणे 'नमस्कार' केला. पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटातही आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार न विसरणाऱ्या अशोकमामांच्या या मन जिंकणाऱ्या कृतीचे (गेस्चर) सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीने संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा अनिकेत सराफ हा देखील या सोहळ्यासाठी फ्रान्समध्ये उपस्थित असून त्याने आई-वडिलांचे सुंदर फोटो शेअर करत आपला अभिमान व्यक्त केला आहे.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


