अमरावतीत: २४ तासांत तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी चाललाय खेळ

अमरावती: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित एक अत्यंत संतापजनक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या २४ तासांच्या आत जिल्ह्यातील बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा या इतर आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. एकापाठोपाठ एका अशा तीन वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये विषबाधेच्या घटना समोर आल्याने मेळघाट आणि अमरावती जिल्ह्यात एकच खडबळ उडाली आहे.

प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाच्या आणि अन्नधान्याच्या गुणवत्तेबद्दल याआधीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरूच असल्याचे या लागोपाठ घडलेल्या घटनांवरून स्पष्ट होते. टिटंबा येथील आश्रमशाळेत जेवणानंतर अचानक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, त्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. हा प्रकार ताजे असतानाच बिजुधावडी, सावलीखेडा आणि सुसर्दा येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनाही असाच त्रास जाणवल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

शासकीय आणि आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत चालवल्या जाणाऱ्या या शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप पालकांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित ठेकेदार आणि दोषी प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून व विविध संघटनांकडून आक्रमकपणे केली जात आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सर्व आश्रमशाळांच्या अन्न पुरवठ्याची व गुणवत्तेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *