छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर झालेली ओळख आणि मैत्री एका ३५ वर्षीय विवाहित महिलेसाठी अत्यंत धोकादायक ठरल्याची एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील चॅट आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका नराधमाने विवाहितेचे अपहरण केले, तिला तब्बल २४ तास एका निर्जन ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार अमानुष अत्याचार केल्याची भीषण घटना घडली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित महिला आणि तिचा पती बदनापूर तालुक्यातील असून ते दोघेही ऊसतोडीचे काम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपी राजू मसू माळी याने या विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. महिलेने ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंग आणि संवाद सुरू झाला. दरम्यान, पीडिता आणि तिचा पती गंगापूर परिसरात ऊसतोडीसाठी गेले असताना आरोपी तिथेही पोहोचला, ज्यामुळे त्यांच्यातील संपर्क अधिक वाढला.
घाटी रुग्णालयातून केले अपहरण:
गेल्या काही दिवसांपूर्वी १४ जुलै रोजी ही पीडित महिला आपल्या मावसभावाला भेटण्यासाठी आपल्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात आली होती. दुपारी चारच्या सुमारास तिची बहीण घरी निघून गेल्यानंतर ती आपल्या भावासोबत रुग्णालयातच थांबली होती. हीच संधी साधून आरोपी राजू माळी तिथे पोहोचला. पीडिता पाणी आणण्यासाठी खाली गेली असता, आरोपीने तिला अडवले. "तुझे इन्स्टाग्रामवरील चॅट आणि खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन," अशी धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या भयंकर धमक्यांमुळे प्रचंड घाबरलेली महिला नाइिलाजाने त्याच्या दुबलीवर बसली. मात्र, आरोपीने क्षणात तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून शहरापासून दूर एका निर्जन भागातील पत्र्याच्या शेडमध्ये नेले.
२४ तास ओलीस ठेवून अत्याचार:
त्या निर्जन ठिकाणी नेऊन नराधम राजू माळी याने त्या विवाहितेला तब्बल २४ तास ओलीस (बंधक) ठेवले आणि तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान पीडितेने हतबल होत मला माझ्या लहान मुलांची खूप आठवण येत आहे, मला कृपया घरी जाऊ द्या, अशी वारंवार हात जोडून विनवणी केली. मात्र, त्या विकृताच्या मनात जराही दया आली नाही. त्यानंतर १६ जुलै रोजी आरोपी तिला नेवासा परिसरातील आणखी एका दुसऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि तिथेही दिवसभर डांबून ठेवत रात्री पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर १७ जुलै रोजी आरोपीने तिला नेवासा येथून बसमध्ये बसवून गावी पाठवून दिले. परंतु, जाताना "जर तू पोलिसांत तक्रार केलीस किंवा पुन्हा माझ्या नादी लागलीस, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी खूनाची धमकीही त्याने दिली.
पतीला सांगितला संपूर्ण प्रकार आणि पोलिसांत धडक:
घरी पोहोचल्यानंतर प्रचंड दहशतीखाली असलेल्या आणि मानसिक धक्का बसलेल्या त्या विवाहितीने घडलेला सर्व भयंकर प्रकार आपल्या पतीला सविस्तर सांगितला. पतीने अत्यंत धाडस दाखवत व पत्नीला धीर देत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीषा केदार आणि त्यांच्या पथकाने तात्काळ तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी वेगाने शोध घेत आरोपी राजू मसू माळी याला नेवासा येथून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६ हजार आदिवासी करणार भव्य गोदाआरती; सिंहस्थ कुंभमेळा तयारीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन!
महाराष्ट्र
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- कोल्हापूर: निधी मिळत नसल्याने महायुतीच्या सदस्यांना सत्तेत आल्याचा पश्चाताप; आमदार सतेज पाटील यांचा मोठा दावा!
- जळगाव: महाराष्ट्रात दिवाळीनंतर होणार मंत्रिमंडळ विस्तार? आमदार बच्चू कडू यांचे मोठे भाकीत, जळगावमधून किशोर पाटलांना मंत्री करण्याची मागणी!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




