नवी दिल्ली: देशभरात कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचं लोण प्रचंड प्रमाणात पसरलं आहे. सोनम वांगचूक यांनी २६ दिवसानंतर उपोषण सोडल्यानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. केंद्र सरकार आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा होत आहे. दिल्लीतील जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या संख्येनं तरुणांचे मोर्चे निघत आहेत. अनेक सेलिब्रिटी मंडळी जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. याचदरम्यान, या आंदोलनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं भाष्य केलं आहे.
मोहन भागवत काय म्हणाले?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील आंबेडकर भवनात विश्वमांगल्य सभेत 'युगानुकूलत्व मातृत्व' कार्यक्रमात विद्यार्थी आंदोलनावर मोठं वक्तव्य केलं. मोहन भागवत म्हणाले की, "युवा पिढी आता प्रश्न विचारू लागली आहे. आपण तरुण होतो तेव्हा प्रश्न विचारत नव्हतो, आज्ञाधारक होतो. आत्ताची पिढी वेगळी आहे, प्रश्न विचारतेय. युवकांसोबत संवाद महत्त्वाचा आहे. त्यांना आदेश देता येणार नाही. नवीन पिढी विश्लेषण करत असते. त्यामुळे आपल्याला संवाद साधण्याची पद्धती बदलावी लागेल," असं भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
पुढे ते म्हणाले की, "आधीचा काळ आज्ञांचं पालन करण्याचा काळ होता. आई-वडिलांनी जे म्हटलं, त्यावर कोणतीही चर्चा होत नव्हती. त्यांच्या आदेशानंतर शांत राहावं लागत होतं. त्यांच्यावर विश्वास होता. आपला त्यांच्या अनुभवावर विश्वास होता."
'नवीन पिढी प्रश्न विचारते'
भागवत पुढे म्हणाले, "आता काळ आधीसारखा राहिलेला नाही. नवीन पिढी प्रश्न विचारते. आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगण्याची गरज आहे. त्यांना वेळ देणे आणि त्यांच्याशी संवाद करण्याची गरज आहे. आता कुटुंबात संवाद होत नाही. कुटुंबात प्रत्येक व्यक्ती त्याचा मोबाईल घेऊन बसलेला असतो. घरात कोणी भेटायला आलं असेल, तरी त्याची कोणालाच माहिती नसते. हे सर्व बदलण्यासाठी भरपूर वेळ जाईल. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा बोलणे होईल. कुटुंबात संवाद झाल्यास मुले मोकळेपणाने बोलतील."
"बाळाचं पालनपोषण १२ वर्षांपर्यंत हातात असतं. आपण जे काही सांगतो, त्यावर स्वतः कृती केली पाहिजे. नवीन पिढीला तुम्ही थेट सांगितल्यास स्वीकारणार नाही. कारण ते आधी विश्लेषण करत असतात," असेही मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




