सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावरील मलकापूरच्या नव्या युनिक उड्डाणपुलावर पहिलाच अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने कार एकमेकांवर आदळल्या

सातारा: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर येथे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या नवीन युनिक उड्डाणपुलावर पहिलाच अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका कारचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या, ज्यामुळे या तिहेरी अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एक कार (क्र. एमएच १० एसी ४५६०) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. मंगळवारी सकाळी १० ते साडेदहाच्या सुमारास ही कार पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवीन उड्डाणपुलावर आली असता, चालकाने अचानक ब्रेक दाबला. याचवेळी पाठीमागून त्याच दिशेने निघालेल्या दुसऱ्या कारने (क्र. एमएच ४६ बीझेड ८९३८) या गाडीला जोरदार धडक दिली. पाठोपाठ आणखी एका तिसऱ्या कारनेही (क्र. एमएच १५ डीसी ४७६३) या दोन्ही वाहनांना पाठीमागून धडक दिली, ज्यामुळे हा तिहेरी अपघात घडला.

या अपघातामध्ये सहभागी असलेल्या तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने तातडीने क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवीन उड्डाणपुलावरच पहिल्याच दिवशी अपघात घडल्यामुळे वाहनधारकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *