
CM Eknath Shinde : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गावी जाताना हेलिकॉप्टर दौऱ्यावरून टीका केली होती. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला प्रत्युत्तरही दिलं होतं. यावरूनच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. याचवेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “आठ तासांत मी १० हजार फाईलींवर सह्या करतो”, असं मुख्यमंत्री शिंदेंनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“महायुती सरकारने एका रुपयामध्ये पीक विमा योजना सुरु केली आहे. शेतकऱ्याने एक रुपया द्यायचा बाकीचे पैसे सरकार भरणार, आता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आणि कापसालाही पैसे देण्याचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांचं वीज बिल देखील माफ करण्याचं काम आपण केलं. कल्याणकारी योजना देण्याचं काम सरकार करत आहे. आम्ही देखील गरीबी पाहिली आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, त्याचा आम्ही काहीतरी व्यवसाय सुरु केला असं अनेक बहिणी सांगत आहेत. अनेक बहिणी त्यांच्या घरात काही खरेदी करतात. याचा अर्थ हे पैसे चलनात येतात आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला फायदा देखील होईल”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
|
Satara : नवीन महाबळेश्वर प्रकल्प रद्द करण्याची पर्यावरणतज्ज्ञांची मागणी |
“आम्ही आता ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच लाडक्या भावांसाठी देखील रोजगार देण्यासाठी योजना आणली आहे. तसेच मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना देखील सुरु केली आहे. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्यामुळे आपण शासन आपल्या दारी योजना सुरु केली. त्याचा पाच कोटी लोकांना लाभ मिळाला. याआधीही लाभार्थी होते, योजनेचा लाभ मिळत होता. पण लोक याचा लाभ घेता घेता कंटाळून जात होते. सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हणून सोडून द्यायचे. त्यामुळे आता आम्ही शासन लोकांच्या घरी नेण्याचे काम केलं”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका
“शेती करायला गावाकडे गेलं की आमच्यावर काहीजण टीका करतात. विरोधक मला म्हणतात की हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. मग आता गावी शेती करायला गाडीने जाऊ का? मग १० तास लागतील किंवा ८ तास लागतील. आठ तासांमध्ये मी १० हजार फाईलींवर सह्या करतो. एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता. कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाहीत. मात्र, मी मातीतला आणि जमिनीवरला माणूस आहे. त्यामुळे गावी गेलं की माझे पाय आपोआप शेताकडे ओळतात”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




