How Telegram Channels Operated a Multi-Crore Scam Demanding Lakhs for Question Papers!

टेलिग्रामवर 'नीट' पेपरचा उघड लिलाव! एका पेपरसाठी १० लाख; करोडोंच्या NEET UG पेपरफुटी घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश

How Telegram Channels Operated a Multi-Crore Scam Demanding Lakhs for Question Papers!
  देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या NEET UG २०२६ परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणाने आता एका मोठ्या सायबर गुन्हेगारीचे रूप धारण केले आहे. या परीक्षा घोटाळ्यात 'टेलिग्राम' (Telegram) या सोशल मीडिया ॲप्लिकेशनचा वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे एक देशव्यापी जाळे कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ३ मे रोजी झालेली मुख्य परीक्षा रद्द झाल्यानंतर, आगामी २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेपूर्वीच (Re-Exam) टेलिग्रामवर पुन्हा सक्रिय झालेल्या टोळ्यांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक सुरू केली आहे.

टेलिग्रामवर १००% ओरिजनल पेपरचा दावा आणि लिलाव: सायबर सेल आणि तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे की, टेलिग्रामवर 'राघव सर' आणि अशाच प्रकारच्या अनेक संशयास्पद नावांनी चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. या चॅनेल्सवर " १०० टक्के ओरिजनल प्रश्नपत्रिका" असल्याचा बनावट दावा केला जात आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे स्कॅमर्स आधीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे खोटे स्क्रीनशॉट्स आणि बनावट पुरावे दाखवून फसवणूक करत आहेत.

१० लाख रुपयांची मागणी आणि व्यवहाराची पद्धत:या बहुकरोडी घोटाळ्यातील व्यवहाराची पद्धत अतिशय नियोजनबद्ध आहे.

मिळालेल्या माहितीनुसार:
१. एका प्रश्नपत्रिकेसाठी थेट १० लाख रुपयांची मागणी केली जात आहे.
२. सौदा पक्का करण्यासाठी आधी ६०,००० रुपये टोकन रक्कम (ॲडव्हान्स) म्हणून घेतली जाते.
३. पोलिसांच्या रडारपासून वाचण्यासाठी हे आरोपी बँक खात्यांऐवजी विशेष क्युआक कोड (QR Codes), क्रिप्टो करन्सी आणि विशिष्ट ॲप्लिकेशन्सचा वापर करून पैसे उकळत आहेत.

आतापर्यंत ७,९०० लोकांची फसवणूक:अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचकडे या घोटाळ्याविरोधात पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका व्हिसलब्लोअरने (माहितीदार) दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने आतापर्यंत तब्बल ७,९०० हून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांच्याकडून सुमारे ५ कोटी ७४ लाख रुपये उकळले आहेत. या घोटाळ्याची पाळेमुळे संपूर्ण देशभर पसरली असून, लातूर, पुणे, नाशिक, राजस्थान आणि हरियाणा येथील अनेक प्राध्यापक, कोचिंग क्लास चालक आणि मध्यस्थांना आधीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. त्यातच आता टेलिग्रामवरील या नवीन डिजिटल फसवणुकीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सायबर पोलिसांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही टेलिग्राम चॅनेल्सच्या खोट्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *