
Mumbai Pune Expressway : ख्रिसमस आणि 31st आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणेकर सज्ज झाले आहेत. शाळा, ऑफिसला सुट्ट्या असल्याने कुटुंबासोबत अन् मित्रांसोबत फिरण्याचे बेत आखले गेलेत. मुंबई आणि पुण्यापासून जवळच्या लोकेशनवर धमाल-मस्ती करण्यासाठी पुणेकर अन् मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळावर विकेंडला गर्दी वाढली आहे. मुंबई आणि पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसतेय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Lonavala ghat traffic update Christmas weekend) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नाताळचा सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडल्याने या महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा निर्माण झाला आहे. लोणावळा परिसरात जुण्या मुंबई पुणे महामार्गावर ही कोंडी अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. लोणावळ्याच्या घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. १० मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागत असल्याचे चित्र आहे.
|
|
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ लोणावळा घाटात दाखल झाले आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे काम वेगात सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वाहतूक स्थितीची माहिती घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेतच. त्याशिवाय ताम्हिणी घाटात आणि नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही वाहतूक जॅम झाली आहे. रायगड पुणे जोडणारा ताम्हिणी घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाताळ आणि नववर्षाच्या स्वातगतासाठी पुणेकर पर्यटक कोकणात निघाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून रायगडच्या दिशेने जाणाऱ्या ताम्हिणी घाटाच्या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्याशिवाय नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरही वाहतूककोंडी झाल्याचे समजतेय. पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



