
Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. अजूनही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचं समोर येतंय. महायुतीच्या ४८ पैकी ४६ जागा निश्चित झाल्या आहेत. परंतु दोन जागांमुळे अजून जागावाटपाचा तिढा कायम आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजुनही रस्सीखेच सुरूच आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. कारण त्याठिकाणी भाजपची ताकद जास्त आहे. परंतु एकनाथ शिंदे ठाणे मतदारसंघ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ती जागा एकनाथ शिंदेसाठी अतिशय प्रतिष्ठेची असल्यामुळे शिंदे सेना ठाणे मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचं दिसतंय.
|
Pune Temperature News : धूलिवंदनाला उच्चांकी तापमान ; पाऱ्याची सरासरी २.७ अंश सेल्सिअसने उसळी |
सध्या तेथे राजन विचारे हे खासदार असून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहेत. ठाण्यात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. यात स्वतः मुख्यमंत्री यांचा मतदार संघ देखील आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये अजूनही निर्णय झालेला नाही. या ठिकाणी जागावाटपाचा तिढा कायम आहे.
तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा तिन्ही पक्ष स्वतः कडे खेचण्याच्या तयारीत आहेत. नाशिकमध्ये विद्यमान स्थितीत हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे खासदार आहेत. मात्र, नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ दावा करत आहेत. यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. याच मुद्द्यावरून काल रात्री (२५ मार्च) नाशिकमधील शिंदे सेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि स्वतः हेमंत गोडसे हे ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या मांडून बसले होते.
नाशिक लोकसभा जागेवर भाजपकडून दावा केला जात आहे. कारण नाशिक मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे भाजप आपली पूर्ण ताकद वापरून ही जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद कमी असल्याचं दिसतंय. याच मुद्द्यावरून ही जागा राष्ट्रवादी आणि भाजप स्वतः कडे घेण्याच्या तयारीत आहे. महायुतीच्या जागावाटपाचा घोळ अजून मिटलेला नाही. नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोघेही आग्रही असल्याचं दिसतंय. परंतु शिंदे सेनेची मात्र कोंडी होत असल्याचं चित्र आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




