सोलापूर: सोशल मीडियाचा गैरवापर करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाईंची भाईगिरी कशी जिरवायची, याचा एक उत्तम नमुना सोलापूर पोलिसांनी दाखवून दिला आहे. सोलापूर शहरातील 'नई जिंदगी' भागात एका तरुणावर धारदार तलवारीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर गाण्यांसह 'रील' (Reels) बनवून दहशत माजवणाऱ्या सैफ शेख या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्याची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याची भरचौकातून पायी चालवत धिंड काढली.
हल्ला केल्यानंतर रील बनवून माजवली होती दहशत
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सैफ शेख याने काही दिवसांपूर्वी जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी नई जिंदगी परिसरात एका तरूणावर तलवारीने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या गुन्ह्यानंतर फरार असलेल्या सैफने कायद्याची कोणतीही भीती न बाळगता सोशल मीडियावर एक व्हिडिओ (रील) अपलोड केला. या रीलमध्ये बॅकग्राउंडला गँगस्टर स्टाईल गाणे लावून त्याने आपल्या गुन्हेगारी कृत्याचे प्रदर्शन केले होते. हा रील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी रचला सापळा; काढली भरचौकातून धिंड
या व्हायरल रीलची आणि गुन्ह्याची गंभीर दखल सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी घेतली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने तपास करत आरोपी सैफ शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कोणतीही गय केली नाही. ज्या नई जिंदगी आणि एमआयडीसी परिसरात त्याने तलवार चालवून दहशत निर्माण केली होती, त्याच परिसरात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून पायी फिरवले.
गुन्हेगारांमध्ये पसरली धडकी
पोलिसांनी भररस्त्यातून त्याची धिंड काढल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. "गुन्हेगारांना कायद्याचा धाक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा कारवायांमुळे सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढतो," अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. सोशल मीडियावर स्वतःला 'भाई' समजणाऱ्या इतर टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांचे धाबे यामुळे दणाणले असून सोलापूर पोलिसांनी हा एक कडक इशारा दिला आहे.
शहर
- पुण्यात ५ भावंडांचे धाडसी पाऊल! 'स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी' सोडले घर; स्वारगेट बस स्थानकात काढली रात्र, पैसे संपताच पालकांना फोन
- थरारक आणि विचित्र अपघात! वसईत भरधाव डम्पर थेट लोखंडी पुलाला धडकला; हायड्रोलिक बटण दाबल्याने डम्पर हवेत अधांतरी लटकला
- बळीराजाला थेंब-थेंब डिझेलसाठी रांगा अन् हाणामारी; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल! मराठवाड्यातील इंधन टंचाईचे विदारक वास्तव
- रत्नागिरीत धक्कादायक घटना! मुंबईहून गावी आलेल्या ३० वर्षीय तरुणाचा गूढ मृत्यू; भावाने आवाज दिला, प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडताच बसला धक्का
महाराष्ट्र
- उल्हासनगर गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच दोन सख्ख्या भावांचा बळी; संतप्त कुटुंबीयांचा गंभीर आरोप
- पुण्यात ५ भावंडांचे धाडसी पाऊल! 'स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी' सोडले घर; स्वारगेट बस स्थानकात काढली रात्र, पैसे संपताच पालकांना फोन
- थरारक आणि विचित्र अपघात! वसईत भरधाव डम्पर थेट लोखंडी पुलाला धडकला; हायड्रोलिक बटण दाबल्याने डम्पर हवेत अधांतरी लटकला
- बळीराजाला थेंब-थेंब डिझेलसाठी रांगा अन् हाणामारी; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल! मराठवाड्यातील इंधन टंचाईचे विदारक वास्तव
गुन्हा
- यवतमाळ हादरले! गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तरुणाची तस्करांकडून निर्घृण हत्या; सुकळी गावात तणाव, दोघांना बेड्या
- पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना! सख्या चुलत्यासोबत २५ तोळे सोने घेऊन मुलगी पळाली; समाजात तोंड कसे दाखवू? या विवंचनेतून वडिलांनी संपवले जीवन
- साताऱ्यात आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेट उद्ध्वस्त! अमेरिकन नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून डॉलर लुटणारे बोगस कॉल सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त
- पुण्यात पोलिसाचेच काळे कृत्य! लग्नाचे आमिष दाखवून पोलीस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाण याच्याविरुद्ध वारजे पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
इतर
- आजचे राशीभविष्य (२३ मे २०२६): 'या' राशींची नोकरी-व्यवसायात होणार प्रगती; अविवाहितांचे जुळणार लग्न!
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- न्यूयॉर्कमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; बसमधून खाली उतरताच अचानक आलेल्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली महिला, भीषण व्हिडिओ व्हायरल
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड! इवांका ट्रम्प यांच्यावर हल्ल्याची तयारी करणारा आयआरजीसीचा दहशतवादी अटकेत
- भारत-अमेरिका संबंधात नवा अध्याय! अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो भारतात; पीएम मोदींसोबतच्या बैठकीत कोणता महत्त्वाचा करार होणार?
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
























Subscribe to my channel




