जळगाव / मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे खासगी सचिव राजेश गायकवाड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दलचे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावरून राज्य सरकार आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर थेट तोफ डागली आहे.
महिला अधिकाऱ्यांशी अर्वाच्च भाषा आणि धमक्या
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे (CMO) या संदर्भात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीका हवाला देत रोहिणी खडसे यांनी आरोप केला आहे की, मंत्री महोदयांचे खासगी सचिव राजेश गायकवाड हे विभागातील महिला अधिकाऱ्यांशी अत्यंत अर्वाच्च आणि अश्लील भाषेत बोलतात. तसेच, कामाचे दडपण आणून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या किंवा दुर्गम भागात बदल्या करण्याच्या सतत धमक्या दिल्या जातात.
मोठ्या रकमा घेऊन बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आरोप
रोहिणी खडसे यांनी लावलेला दुसरा सर्वात मोठा आरोप म्हणजे महिला व बालविकास विभागात मोठ्या प्रमाणावर 'बदल्यांचे रॅकेट' (Transfer Racket) सुरू आहे. राजेश गायकवाड हे अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यासाठी किंवा मर्जीतील लोकांना पदे देण्यासाठी मोठमोठ्या रकमा लाच म्हणून उकळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा गैरप्रकार गेल्या काही काळापासून सातत्याने सुरू असून विभागातील अनेक प्रामाणिक अधिकारी या जाचाला कंटाळले आहेत.
मंत्र्यांचा वरदहस्त आहे का? रोहिणी खडसेंचा थेट सवाल
या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत रोहिणी खडसे यांनी मंत्री अदिती तटकरे यांच्यावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "राजेश गायकवाड हे २०१9 पासून या विभागात खासगी सचिव म्हणून ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक महिलांनी तक्रारी केल्या होत्या. इतक्या गंभीर तक्रारी समोर येऊनही मंत्री तटकरे यांनी गायकवाड यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई का केली नाही? गायकवाड यांना मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे का? त्यांच्यात काही आर्थिक लागेबांधे आहेत का?" असे तिखट सवाल खडसे यांनी उपस्थित केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोषी सचिवावर निलंबनाची कारवाई करावी आणि सखोल चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



