पुण्यात राजकीय खळबळ! वारकरी संप्रदायावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक!

Vikas Lawande (@vikaslawande) • Instagram photos and videosपुणे: वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पुणे शहरातील वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. लवांडे यांच्या या अटकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर वारकरी संप्रदाया संदर्भात भाष्य केले होते. या वक्तव्यानंतर वारकरी संप्रदायातील अनुयायी आणि विविध संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई आणि अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी विकास लवांडे यांनी न्यायालयात धाव घेत अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.

परंतु, या प्रकरणात तपास करत अखेर वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत विकास लवांडे यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. अटक होण्यापूर्वी लवांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका देखील मांडली होती. मात्र, धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कायदेशीर पावले उचलली आहेत. या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *