
Pune : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काँग्रेसने कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही, असं जाहीर केलं. यानंतर काल रात्रीपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला बघायला मिळाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचीदेखील भेट घेतली. रात्री उशिरा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुण्यातील जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी अजित पवार यांची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जागावाटपाबाबत कोणताही वाद नाही. पण दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकाच चिन्हावर निवडणूक लढवतील, असा अजित पवार यांचा प्रस्ताव आहे. अजित पवार यांचा हा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना कळवला जाणार आहे. त्यानंतर आज रात्री किंवा उद्या युतीची घोषणा होणार आहे. असं असलं तरी घड्याळ चिन्ह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य होणार का? हे पाहावे लागेल. "आज संध्याकाळपर्यंत निरोप द्या", असं अजित पवारांनी बैठकीला आलेल्या नेत्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे.
|
|
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. "आज आम्ही चौघांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. आमची भूमिका त्यांना सांगितली. चर्चा झाली पण निर्णयापर्यंत पोहोचलो नाही. आज सांगण्यासारखं काही नाही. अजून चर्चा करायची आहे ती होईल. काही प्रस्ताव दिले आहेत, चर्चा केली आहे. त्यांच्यावतीने बाकीचे कुणी नव्हते. आमच्यामध्ये अजून एक बैठक होईल. बाकीच्या लोकांसोबत चर्चा करून कळवतो, असं ते म्हणाले. आमची चर्चा महाविकास आघाडीसोबत देखील सुरू आहे. काँग्रेसने काल घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे स्वरूप आता बदललं आहे", असं अंकुश काकडे म्हणाले.
शहर
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- हिंगोली: सोयाबीन पिकाची नासाडी डोळ्यांसमोर पाहून वसमतमधील ६० वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- सातारा: कराडला 'ऑक्टोबर हीट'चा प्रचंड तडाखा! वाढत्या उकाड्याने नागरिक घामाघूम, तर कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ थंडावली
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगावर धडकण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींचा 'गनिमी कावा'आकाशवाणी भवनात ठिय्या आणि राजकीय संघर्ष शिगेला
गुन्हा
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान






















Subscribe to my channel


