पाटणा: बिहारची राजधानी पाटणामधून माणुसकीला कलंकित करणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. पाटणा सिटी परिसरातील चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधम पतीने आपल्या पहिल्या पत्नीच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पहिल्या पत्नीसह तिचे आई-वडील आणि दोन निष्पाप चिमुरड्यांवर पेट्रोल ओतून त्यांना आगीच्या हवाली केले. या भीषण अग्नितांडवात कुटुंबातील पाचही जण गंभीररीत्या होरपळले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आगीची धग लागल्याने आरोपी स्वतःही जखमी झाला आहे.
थंड डोक्याने रचला कट; पळण्याचे मार्ग केले बंद
मिळालेल्या माहितीनुसार, चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजा बाबू खाटू श्याम गल्लीत ही घटना घडली. आरोपी कन्हाई कुमार याने अत्यंत थंड डोक्याने या अमानुष गुन्ह्याचा कट रचला होता. घटस्फोट आणि पैशांच्या वादातून निर्माण झालेल्या रागापोटी तो बुधवारी पहिल्या पत्नीच्या घरी पोहोचला. घरातून कोणीही बाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याने आधी अत्यंत क्रूरपणे घराच्या मुख्य जिन्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून दिला, जेणेकरून मदतीसाठी किंवा जीव वाचवण्यासाठी कोणालाही खाली उतरता येऊ नये. त्यानंतर तो थेट घरात घुसला.
दोन निष्पाप मुलांसह ५ जणांना पेटवले
घरात प्रवेश करताच कन्हाई कुमार याने सोबत आणलेले पेट्रोल आपली पहिली पत्नी, सासू, सासरे आणि दोन निष्पाप लहान मुलांवर ओतले आणि क्षणाचाही विचार न करता आग लावून दिली. बघता बघता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि घरातून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. आग इतकी वेगाने पसरली की तिची धग लागल्याने आरोपी कन्हाई स्वतः देखील भाजला आणि जखमी झाला.
परिसरात खळबळ; प्रकृती चिंताजनक
घरातून येणारे रडण्याचे आवाज आणि धूर पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिकांनी मोठ्या शर्थीने घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि आगीवर नियंत्रण मिळवत पाचही जणांना बाहेर काढले. सर्वांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र ते मोठ्या प्रमाणावर भाजल्यामुळे सर्वांचीच प्रकृती कमालीची चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी आरोपी कन्हाई कुमारला देखील ताब्यात घेतले असून त्याच्यावर रुग्णालयात कडक पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. घटस्फोटाचा राग आणि पैशांची हाव एका माणसाला इतक्या क्रूर थराला घेऊन जाऊ शकते, हे पाहून संपूर्ण पाटणा शहर हादरून गेले आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



