कोल्हापूर: कोल्हापूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास राजकीय मुजोरी आणि पोलिसांवर हल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष आणि महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा चंद्रसेन चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंकाळा तलाव परिसरातील फिटनेस सेंटर आणि टिंबर मार्केटच्या कमानीसमोर हा सर्व हायव्होल्टेज ड्रामा घडला.
नेमकी घटना काय घडली?
जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन दादू कुंभार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे रंकाळा परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी रंकाळा तलावाजवळील फिटनेस सेंटर समोरील कमानीच्या परिसरात काही तरुण मोठ्याने आरडाओरडा करत दंगामस्ती करताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी रात्रीच्या वेळी शांतता राखण्याचे आवाहन करत या तरुणांना समज देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या टोळक्यात असलेल्या चंद्रसेन सचिन चव्हाण (वय २१, रा. लाड चौक, शिवाजी पेठ) याने पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे वाद घालण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की चंद्रसेनने थेट ऑन-ड्यूटी पोलीस अंमलदार कुंभार यांच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडली आणि "तुम्ही मला शिकवणार का? काय करायचे ते करा," अशी धमकी दिली.
बापाने आडवे लावले वाहन; कोर्टालाही दिले आव्हान
पोलिसांवर हात टाकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी तातडीने चंद्रसेनला ताब्यात घेतले आणि त्याला सरकारी गाडीत बसवून पोलीस ठाण्याकडे घेऊन जाण्यास निघाले. मात्र, हा निरोप मिळताच त्याचे वडील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण हे स्वतःच्या चारचाकी वाहनातून तिथे पोहोचले. त्यांनी टिंबर मार्केट कमानीसमोर आपले वाहन थेट पोलिसांच्या गाडीसमोर आडवे लावले आणि पोलिसांचा रस्ता अडवला.
"माझ्या मुलाला कसे घेऊन जाता ते पाहतोच, काय कारवाई करायची ती करा," अशी दर्पोक्ती करत सचिन चव्हाण यांनी पोलिसांशी तीव्र हुज्जत घातली. धक्कादायक बाब म्हणजे, "कोर्ट माझं काही वाकडं करू शकत नाही," असे म्हणत त्यांनी थेट न्यायव्यवस्थेला आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले.
पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
पोलिसांनी या दबावाला बळी न पडता दोन्ही आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे, धमकावणे आणि शिवीगाळ करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून, खाकी वर्दीचा आदर न करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या या नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




