बीड / केज:
बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, केज तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व मंडळी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेलेली असताना, १६ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरातून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान एक धक्कादायक वळण समोर आले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई-वडील गुरुवारी एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी नेकनूर येथे गेले होते. रात्री उशिरा ते घरी परतले असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी रात्रभर नातेवाईक आणि शेजाऱ्यांकडे शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
भावाच्या फोनने प्रकरणाला वेगळे वळण:
मुलगी बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्या भावाच्या मोबाईलवर अंबाजोगाई तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत सदस्याचा फोन आला. "तुमची मुलगी एका तरुणासोबत आमच्या गावात आली आहे," अशी माहिती या सदस्याने दिली. या माहितीनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
गावातीलच मुलावर संशय:
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गावातीलच एका १६ वर्षीय मुलाने या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे आरोपी मुलगादेखील अल्पवयीन आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलीस तपास:
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बेपत्ता मुलगी आणि संशयित मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. दोन्ही अल्पवयीन व्यक्तींच्या शोधार्थ तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीचा आधार घेतला जात आहे.
शहर
- ग्रामीण शिक्षणाला बळ! पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आता १० वी पर्यंत; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी मोठा निर्णय
- ठाणेकरांचा प्रवास आता अधिक 'रॉयल'! १ मे रोजी पहिल्या टीएमटी डबल डेकर एसी बसचे लोकार्पण
- लोणावळा बसस्थानकावर प्रवाशाची लूट! आमदार प्रताप सरनाईक संतापले; दुकानदाराला महिलेचे पैसे परत करायला लावले
- हार्बर लाईनच्या प्रवाशांना दिलासा! १ मेपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्या; विना-एसी लोकलच्या वेळापत्रकातही बदल
महाराष्ट्र
- कल्याण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! लोकलमध्ये प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
- ग्रामीण शिक्षणाला बळ! पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा आता १० वी पर्यंत; विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी मोठा निर्णय
- ठाणेकरांचा प्रवास आता अधिक 'रॉयल'! १ मे रोजी पहिल्या टीएमटी डबल डेकर एसी बसचे लोकार्पण
- लोणावळा बसस्थानकावर प्रवाशाची लूट! आमदार प्रताप सरनाईक संतापले; दुकानदाराला महिलेचे पैसे परत करायला लावले
गुन्हा
- कल्याण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! लोकलमध्ये प्रवाशावर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
- नागपूर हादरले! जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; मुख्य आरोपीला बेड्या, परिसरात खळबळ
- भोंदूगिरीला चाप! अशोक खरात प्रकरणानंतर १५ भोंदू बाबांविरुद्ध गुन्हे दाखल; अंनिसने जाहीर केली यादी
- पुणे: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे एका वृद्ध महिलेवर भरदिवसा झालेल्या अमानुष हल्ल्याने मोठी खळबळ माजली
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
विडियो गॅलेरी

देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?























Subscribe to my channel




