
Jammu and Kashmir : काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला असून या वेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये दाखल झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेत्यांनी नि:शस्त्र पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
अनुच्छेद ३७० हटविण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून वारंवार करण्यात येतो. ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ अशी ओळख असलेल्या राज्यात यंदा प्रथमच देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असताना मंगळवारी पहेलगाम शहरापासून सहा किलोमीटरवरील बैसरन या गवताळ पठारावर अतिरेक्यांनी हा नियोजित हल्ला केला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटत असताना किमान पाच अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. पर्यटकांना टिपून लक्ष्य करण्यात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला. मात्र मोकळे मैदान असल्यामुळे पर्यटकांना आडोसा घेण्याचीही सवड मिळाली नाही. गोळीबार करून अतिरेकी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिस दाखल झाले. अतिरेक्यांच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणांची पथके चारही दिशांना रवाना करण्यात आली आहेत. बंदी घातलेल्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाची हस्तक असलेल्या ‘द रेसिडन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
|
|
बैसरन पठारावर केवळ पायी किंवा खेचरांवरूनच तेथे जाता येते. हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांनी खेचरांवरून जखमींना पक्क्या रस्त्यापर्यंत नेले आणि तेथून रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना पहेलगाम आणि अनंतनागमधील रुग्णालयांत हलविण्यात आले. पंतप्रधानांनी हल्ल्याचा ‘एक्स’ समाजमाध्यमावरून निषेध केला असून दोषींना कडक शिक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. तर अब्दुल्ला यांनी हल्लेखोरांचा उल्लेख ‘अमानवी श्वापदे’ असा केला. गेल्या काही वर्षांत नागरिकांवर झालेला हा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे ते म्हणाले.
त्यांना (अतिरेक्यांना) माफी नाही! त्यांचे दुष्ट हेतू कधीही सफल होणार नाहीत. दहशतवादविरोधी लढ्याचा आमचा निर्धार अभेद्या आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो. पीडितांना सर्व प्रकारची मदत मिळेल, अशी हमी देतो.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
घटनेमुळे मला प्रचंड धक्का बसला आहे. आमच्या पाहुण्यांवर झालेला हल्ला घृणास्पद आहे. हल्ला करणाऱ्या अमानवी श्वापदांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निर्विवादपणे हा गेल्या काही वर्षांत थेट नागरिकांवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे.– ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!



























Subscribe to my channel



